Join us

जगातील श्रीमंत व्यक्तीचा पुन्हा इलाॅन; अदानी-अंबानीही जगाच्या यादीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 06:06 IST

उद्याेगपती गाैतम अदानी १०० अब्ज डाॅलर क्लबमध्ये दाखल

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उद्याेगपती गाैतम अदानी यांनी अब्जाधीशांच्या यादीत  माेठी झेप घेतली असून ते १०० अब्ज डाॅलरच्या क्लबमध्ये पुन्हा दाखल झाले आहेत. त्यांची संपत्ती १०१ अब्ज डाॅलर म्हणजे सुमारे ८.३८ लाख काेटी रुपये एवढी झाली आहे. 

ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या यादीत ते १२व्या स्थानी पाेहाेचले आहेत. हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी यांची संपत्ती १०० अब्ज डाॅलरपेक्षा कमी झाली हाेती.  उद्याेगपती मुकेश अंबानी हे या यादीत ११व्या स्थानी आहेत. टेस्लाचे मालक इलाॅन मस्क यांनी श्रीमंतांच्या यादीत पुन्हा पहिले स्थान पटकाविले आहे.

टॅग्स :व्यवसायएलन रीव्ह मस्कमुकेश अंबानीगौतम अदानी