Join us

देशात हवी २,८४० विमाने आणि ४१ हजार पायलट, तांत्रिक कामांसाठी लागणार ४७ हजार कर्मचारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 08:10 IST

सध्या हैदराबाद येथे विंग्ज इंडिया हा सर्वांत मोठा आंतरराष्ट्रीय विमान मेळावा सुरू आहे. जगातील अनेक कंपन्या यात सामील झाल्या आहेत. या दरम्यान, काही तज्ज्ञांनी भारतीय हवाई क्षेत्राबद्दल मत प्रदर्शन केले आहे.

मुंबई : भारतामध्ये हवाई मार्गांची वाढती संख्या आणि प्रवाशांच्या संख्येत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आगामी २० वर्षांत भारताला आणखी किमान २८४० विमानांची गरज भासणार असल्याचे मत विमान क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या विमानांकरिता तब्बल ४१ हजार नव्या वैमानिकांची तसेच अन्य तांत्रिक कामांसाठी ४७ हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे.  सध्या हैदराबाद येथे विंग्ज इंडिया हा सर्वांत मोठा आंतरराष्ट्रीय विमान मेळावा सुरू आहे. जगातील अनेक कंपन्या यात सामील झाल्या आहेत. या दरम्यान, काही तज्ज्ञांनी भारतीय हवाई क्षेत्राबद्दल मत प्रदर्शन केले आहे.

पाच वर्षांत नवीन ५० विमानतळांची भर गेल्या १० वर्षांत भारतातील विमानतळांची संख्या १५० झाली. येत्या पाच वर्षांत आणखी ५० नवीन विमानतळ तयार होत आहेत. भारतीय कंपन्यांनी २०२३ आणि या नव्या वर्षात मिळून एकूण ११०० नव्या विमानांची ऑर्डर दिली आहे.

टॅग्स :विमान