Join us  

2 रुपयांच्या 'या' शेअरनं दिला बंपर परतावा, एक लाखाचे केले 13 कोटी रुपये; गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 7:39 PM

ब्रोकरेज हाऊसने या मल्टीबॅगर स्टॉकवर बाय रेटिंग दिली आहे. तसेच, याची टार्गेट प्राइस 3,065 रुपये प्रति शेअर एवढे केली आहे.

एसआरएफच्या (SRF) शेअर्समध्ये आज जबरदस्त तेजी दिसून आली. कंपनीचा शेअर 4.05 टक्के वाढीसह 2,731 रुपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या तीन वर्षांत SRF च्या शेअरची किंमत (SRF share price) 76 टक्के CAGR ने वाढली आहे. 

ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या मते, कंपनी नव्या आणि अधिक कॉम्प्लॅक्स सेक्टर्समध्ये (जसे फ्लोरो-केमिस्ट्री) उद्योग वाढविण्याची तयारी करत आहे. ब्रोकरेज हाऊसने या मल्टीबॅगर स्टॉकवर बाय रेटिंग दिली आहे. तसेच, याची टार्गेट प्राइस 3,065 रुपये प्रति शेअर एवढे केली आहे.

वर्षभरातच दिला 152.43 टक्के परतावा -केमिकल स्टॉक (Chemical stock) एक वर्षाच्या कालावधीतच 152.43 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. तर या वर्षी 2022मध्ये 14 टक्क्यांनी वाढला आहे. या केमिकल स्टॉकचे मॅक्झिमम रिटर्न 1 लाख 32 हजार पर्सेंटपेक्षाही अधिक आहे. SRF चा शेअर 23 साल वर्षांत 2.06 रुपयांवरून 2700 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरने या काळात दीर्घ गुंतवणूक करणाऱ्यांना जवळपास 132,295.63 टक्क्यांचा परतावा दिला आहे. म्हणजेच 23 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 2.06 रुपयांच्या हिशेबाने 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आज 13 कोटी रुपयांहूनही अधिकचा फायदा झाला असता.

सरकारच्या या निर्णयाचाही परिणाम - तज्ज्ञांच्या मते, भारत सरकारने नुकतीच हायड्रोकार्बन फ्लोरो केमिकलच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात केवळ SRF च हे रसायन तयार करते. यामुळे, एसआरएफला आणखी नवीन संधी मिळू शकतात आणि या स्टॉकमध्ये जोरदार तेजी येऊ शकते, अशी आशा बाजारातील विश्लेषकांना आहे

 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारपैसा