Join us

भारतीयांचे सरासरी उत्पन्न २ लाखांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 10:05 IST

एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे की, जीडीपीच्या विद्यमान किमतीनुसार चालू वित्त वर्षात दरडोई जीडीपी २.११ लाख रुपये झाला आहे. या मागील १ दशकात त्यात वार्षिक ८.९ टक्के चक्रवाढ पद्धतीने वाढ झाली आहे. 

नवी दिल्ली : भारताचा दरडोई जीडीपी प्रथमच २ लाख रुपयांच्या वर गेला आहे. नागरिकांच्या जगण्याच्या गुणवत्तेत सुधारण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना आणि थेट लाभ हस्तांतरण योजना यामुळे दरडोई जीडीपी वाढला आहे, असे स्टेट बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या एका अहवालात म्हटले आहे.

एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे की, जीडीपीच्या विद्यमान किमतीनुसार चालू वित्त वर्षात दरडोई जीडीपी २.११ लाख रुपये झाला आहे. या मागील १ दशकात त्यात वार्षिक ८.९ टक्के चक्रवाढ पद्धतीने वाढ झाली आहे. 

दरडाेई जीडीपी म्हणजे काय?दरडाेई जीडीपी हे देशाच्या एकूण उत्पादनाचे माेजमाप आहे. देशाच्या एकूण जीडीपीला लाेकसंख्येने विभागल्यास दरडाेई जीडीपी कळते. एका अर्थाने देशाच्या सर्व नागरिकांचे सरासरी उत्पन्न म्हणता येईल. राहणीमानाचे मानक म्हणूनही दरडाेई जीडीपी वापरला जाताे.

३०.२% - दर वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये राहिला. ३२.३% - टक्क्यांपर्यंत हा दर चालू वर्षात जाऊ शकतो. २०१३-१४ नंतरचा हा उच्चांक आहे. ११% - आर्थिक बचत वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये होती. १५.४% - ही बचत २०२२-२३ मध्ये झाली.  

टॅग्स :व्यवसायपैसा