Join us

महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 12:40 IST

blackmailing monks : एका महिलेने भिक्षूंसोबत शारिरीक संबंध ठेवून त्याचे चित्रिकरण केलं. त्यानंतर हे फोटो आणि व्हिडीओ पाठवून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप आहे.

blackmailing monks : थायलंडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्याने संपूर्ण देशाची धार्मिक आणि सामाजिक व्यवस्था हादरली आहे. एका महिलेने गेल्या तीन वर्षांत तब्बल नऊ बौद्ध भिक्षूंना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून ३८५ दशलक्ष बाथ (सुमारे १०२.१४ कोटी) एवढी प्रचंड रक्कम उकळल्याचा आरोप आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, पोलिसांनी या महिलेची ओळख "मिस गोल्फ" अशी केली आहे.

या महिलेने भिक्षूंना आधी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त केले आणि त्यानंतर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ वापरून त्यांना ब्लॅकमेल केले. चौकशीदरम्यान, तिच्या घरात ८०,००० हून अधिक असे फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत, ज्यांचा वापर भिक्षूंना ब्लॅकमेल करण्यासाठी केला गेला होता. जूनच्या मध्यात बँकॉकमधील एका मठाधिपतीने अचानक आपले भिक्षूपद सोडल्यानंतर हे प्रकरण पोलिसांच्या निदर्शनास आले.

कशी होती 'मोडस ऑपरेंडी' काय होती?थाई पोलिसांच्या मते, मे २०२४ मध्ये मिस गोल्फचे एका भिक्षूशी 'संबंध' होते. त्यानंतर तिने तिच्या पोटात त्याचे बाळ वाढत असल्याचा दावा केला. तिने बाळाच्या पालनपोषण खर्चासाठी सुमारे १.८५ कोटी रकमेची मागणी केली.

तपासादरम्यान पोलिसांना कळले की, इतर भिक्षूंनाही याच पद्धतीने ब्लॅकमेल केले गेले होते. पोलिसांनी याला तिची "मोडस ऑपरेंडी" (काम करण्याची पद्धत) म्हटले आहे. विशेष बाब म्हणजे, तिने वसूल केलेले जवळजवळ सर्व पैसे काढून घेण्यात आले आहेत आणि त्यातील काही पैसे ऑनलाइन जुगारासाठी वापरले गेले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महिलेविरुद्ध गंभीर आरोप पण...मिस गोल्फवर खंडणी, मनी लाँडरिंग आणि चोरीच्या वस्तू स्वीकारणे यासह अनेक गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. हा घोटाळा थायलंडच्या अत्यंत आदरणीय बौद्ध संस्थेला हादरवून टाकणारा प्रकार आहे. अलीकडच्या काळात थायलंडमधील बौद्ध भिक्षूंवर लैंगिक गुन्हे आणि अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतल्याचे अनेक आरोप झाले आहेत, ज्यामुळे बौद्ध धर्माची प्रतिमा डागाळली आहे.

'गैरवर्तन करणाऱ्या भिक्षूंसाठी हॉटलाइनथायलंडमध्ये ९०% पेक्षा जास्त लोक बौद्ध धर्माचे पालन करतात. भिक्षूंचा समाजात खूप आदर केला जातो. अनेक थाई पुरुषांना पुण्य मिळवण्यासाठी आणि चांगले कर्म संचयित करण्यासाठी काही काळासाठी भिक्षू बनणे सामान्य मानले जाते.

वाचा - मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

या घोटाळ्यानंतर पोलिसांनी आता "गैरवर्तन करणाऱ्या भिक्षूंची" तक्रार करण्यासाठी लोकांसाठी एक हॉटलाइन (Helpline) उघडली आहे. तसेच, थाई बौद्ध धर्माचे प्रशासकीय प्राधिकरण असलेल्या संघ सर्वोच्च परिषदेने सध्याच्या मठ नियमांचे पुनरावलोकन करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याची योजना जाहीर केली आहे. दरम्यान, सरकारने मठ संहितेचे उल्लंघन करणाऱ्या भिक्षूंसाठी दंड आणि तुरुंगवासासह कठोर शिक्षेची वकिली केली आहे.

टॅग्स :सायबर क्राइमगुन्हेगारीथायलंडखंडणी