Join us
Daily Top 2Weekly Top 5

OTP चं टेन्शन संपणार, आता SIM बदलताच ब्लॉक होणार बँक अकाऊंट; पाहा काय आहे नवं सायलेंट ऑथेंटिकेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 08:36 IST

Silent Authentication SIM Cloning Fraud: देशातील मोठ्या खाजगी बँका आणि टेलिकॉम कंपन्या आता वन-टाइम पासवर्ड (OTP) हटवण्याच्या तयारीत आहेत.

बँका आणि टेलिकॉम कंपन्यांकडून 'सायलेंट ऑथेंटिकेशन मेकॅनिझम'वर काम सुरू

Silent Authentication SIM Cloning Fraud: देशातील मोठ्या खाजगी बँका आणि टेलिकॉम कंपन्या आता वन-टाइम पासवर्ड (OTP) हटवण्याच्या तयारीत आहेत. त्याऐवजी दोन्ही मिळून एका 'सायलेंट ऑथेंटिकेशन मेकॅनिझम'वर काम करत आहेत. ही एक प्रकारची बॅकग्राउंड तपासणी आहे. याद्वारे तुमच्या मोबाईलमध्ये तेच सिम आहे का, जे तुमच्या बँक ॲपशी जोडलेलं आहे की नाही तपासण्याचं काम केलं जाईल.

जर या तपासणीत काही गडबड आढळली, तर ते ट्रान्झॅक्शन त्वरित संशयास्पद मानलं जाईल किंवा त्याच वेळी ब्लॉक केलं जाईल. विशेष म्हणजे यासाठी ग्राहकाला काहीही करण्याची गरज नसेल. हे तंत्रज्ञान 'ई-सिम' (eSIM) वर देखील काम करेल. सिम क्लोनिंग आणि चुकीच्या पद्धतीनं 'ई-सिम स्वाइप' म्हणजेच सिम बदलणं याद्वारे होणारी फसवणूक रोखण्यासाठी सुरक्षेचा हा अतिरिक्त स्तर तयार करण्यात आला आहे. फसवणूक करणारे अनेकदा याच मार्गांनी ओटीपी चोरण्याचं काम करतात.

सायलेंट ऑथेंटिकेशन: बँका आता बॅकग्राउंडमध्येच तुमच्या फोनमधील रजिस्टर्ड सिम अॅक्टिव्ह आहे की नाही, हे तपासून घेतील.सिम क्लोनिंगवर लगाम: नवीन तंत्रज्ञानामुळे सिम क्लोनिंग आणि ई-सिमद्वारे होणारी फसवणूक थांबेल.

मोबाईल नेटवर्क देणार संकेत

ॲक्सिस बँकेचे ग्रुप एक्झिक्युटिव्ह (डिजिटल बिझनेस) समीर शेट्टी यांनी सांगितलं की, आम्ही टेलिकॉम कंपन्यांसोबत मिळून 'सायलेंट ऑथेंटिकेशन'च्या अनेक चाचण्या करत आहोत, ज्यामध्ये ग्राहकाला काहीही करण्याची गरज पडत नाही. जर कोणी ॲपमध्ये लॉग-इन असेल पण मोबाईल नंबर रजिस्टर्ड नंबरशी जुळत नसेल, तर मोबाईल नेटवर्क आम्हाला तसा संकेत देतं. यामुळे ग्राहकाला त्रास न देता संभाव्य फसवणूक शोधणं आम्हाला शक्य होतं.

इतर नियोजित बदल

टेलिकॉम कंपन्या आता एसएमएस ऐवजी त्यांच्या स्वतःच्या ॲप्सद्वारे ओटीपी पाठवण्याचा विचार करत आहेत. कारण एसएमएसद्वारे येणारे ओटीपी हॅक करणं सोपं असतं. हे सर्व रिझर्व्ह बँकेच्या त्या आदेशानुसार होत आहे, ज्यामध्ये १ एप्रिलपासून सर्व डिजिटल व्यवहारांसाठी टू स्टेप ऑथेंटिकेशन सिक्युरिटी अनिवार्य करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : No more OTP! SIM change will block bank accounts.

Web Summary : Banks and telecom companies are developing 'Silent Authentication' to prevent fraud. It verifies the SIM linked to your bank app, blocking suspicious transactions. This technology works on eSIM too, stopping SIM cloning and unauthorized swaps, enhancing security without customer intervention.
टॅग्स :धोकेबाजीबँकपैसा