Join us

टेलिकॉम क्षेत्रासाठी 'अच्छे दिन', MTNL, Airtel, Vi सह 'या' कंपन्यांचे शेअर्स 19% पर्यंत वधारले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 13:50 IST

Telecom Sector: टेलिकॉम कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज मोठी वाढ दिसून आली.

Telecom Sector: इस्रायल आणि इराणमधील युद्ध थांबल्यामुळे शेअर बाजाराला संजीवनी मिळाली आहे. यामुळे टेलिकॉम कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज(२५ जून) मोठी वाढ दिसून येत आहे. एमटीएनएल, व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेल सारख्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आज एमटीएनएलचे शेअर्स १९% पेक्षा जास्त वाढले, तर व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलचे शेअर्सही सुमारे ३% ने वाढले. याशिवाय, टीटीएमएल, एचएफसीएल, भारती हेक्साकॉम आणि इंडस टॉवर्स सारख्या कंपन्यांचे शेअर्सही १% ने ५% वर गेले.

अपेक्षेपेक्षा चांगले निकालही तेजी काही काळापासून सुरू आहे. मार्च तिमाहीत (Q4FY25) टेलिकॉम कंपन्यांनी दाखवलेले निकाल अपेक्षेपेक्षा चांगले होते. बाजारातील तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, या क्षेत्रात मोठा बदल होत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार पुन्हा या शेअर्सकडे वळत आहेत.

काय बदल होत आहे?कोव्हिडपासून प्रति ग्राहक सरासरी महसूल (ARPU) मध्ये चांगली वाढ झाली आहे. तसेच, कंपन्यांच्या ग्राहकांची संख्या वाढल्यामुळे डेटा वापरही वाढत आहे. गेल्या एका महिन्यात स्टरलाईट टेक, एमटीएनएल, आयटीआय आणि रेलटेल कॉर्पोरेशन सारख्या शेअर्समध्ये १२% वरून ३८% पर्यंत वाढ झाली आहे.

६,१०० कोटी रुपयांचा नफाब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने सांगितले की, मार्च तिमाहीत संपूर्ण टेलिकॉम क्षेत्राने नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत या क्षेत्राला १,५०० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता, परंतु यावर्षी ६,१०० कोटी रुपयांचा नफा झाला आहे. हे उत्पन्न मुख्यतः भारती एअरटेलमुळे आहे, इतर कंपन्यांचे निकाल कमकुवत होते. तज्ञांचा भविष्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन आहे. त्यांना अपेक्षा आहे की, प्रति ग्राहक सरासरी महसूल वाढत राहील. 

ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शियलने म्हटले की, पुढील ३ ते ५ वर्षांत टेलिकॉम कंपन्यांचा एआरपीयू दरवर्षी सुमारे १२% दराने वाढू शकतो. फर्मने भारती एअरटेल आणि भारती हेक्साकॉमच्या शेअर्सवर 'खरेदी' करण्याचा सल्ला दिला आहे. जिओबद्दलचा त्यांचा दृष्टिकोनही सकारात्मक आहे. टाटा कम्युनिकेशन्सचे शेअर्स देखील 'खरेदी' यादीत आहेत. 

(टीप: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकव्यवसायएअरटेलव्होडाफोन आयडिया (व्ही)जिओबीएसएनएलएमटीएनएल