TCS Layoffs 2025 : सध्या जगभरात आर्टीफिशियल इंटिलिजेन्स अर्थात एआयमुळे अनेक क्षेत्रात रोजगारांवर परिणाम होत आहे. गुगलपासून मेटापर्यंत अनेक मोठमोठ्या टेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात सुरू आहे. यात भारतीय कंपन्याही मागे नाहीत. देशातील सर्वात मोठी आयटी क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आपल्या कार्यप्रणालीत मोठा बदल करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने जवळपास १२,००० कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या लेऑफमध्ये, ज्या कर्मचाऱ्यांमध्ये कंपनीच्या मानकांनुसार आवश्यक कौशल्ये नाहीत, त्यांना लक्ष्य केले जाईल.
या मोठ्या निर्णयामुळे प्रभावित होणाऱ्या कर्मचाऱ्यांना टीसीएसने दोन वर्षांपर्यंत आगाऊ वेतन नुकसान भरपाई म्हणून देण्याची तयारी दर्शवली आहे. याव्यतिरिक्त, कर्मचाऱ्यांसाठी करिअर ट्रान्झिशन आणि मानसिक आरोग्यासाठी मदत यांसारखे उपायही कंपनीने सुरू केले आहेत.
नुकसान भरपाईची संरचना काय आहे?टीसीएसने कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या कालावधीनुसार नुकसान भरपाईची संरचना तयार केली आहे. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, भरपाईचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल.
सेवेचा कालावधी | नुकसान भरपाई (वेतन) |
१० ते १५ वर्षे | १.५ वर्षांचे वेतन |
१५ वर्षांहून अधिक | २ वर्षांचे अतिरिक्त वेतन |
सर्वांसाठी अतिरिक्त | ३ महिन्यांच्या नोटीस कालावधीचे वेतन |
'बेंच'वर असलेल्यांसाठी नियमजे कर्मचारी आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ 'बेंच'वर आहेत (म्हणजे सध्या त्यांच्याकडे कोणताही प्रकल्प नाही), त्यांना केवळ तीन महिन्यांच्या नोटीस कालावधीचे वेतन दिले जाईल.टीसीएसने एका निवेदनात म्हटले आहे की, कंपनीच्या मूल्यांशी सुसंगत राहून, या पुनर्रचना उपक्रमामुळे प्रभावित झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक परिस्थितीनुसार त्यांना पूर्ण सहकार्य आणि काळजी दिली जाईल.
वाचा - नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
कर्मचाऱ्यांसाठी लवकर निवृत्तीचा पर्यायजे कर्मचारी निवृत्तीच्या जवळ आहेत, त्यांना टीसीएस लवकर निवृत्तीची ऑफर देत आहे.फायदे: या योजनेअंतर्गत, कर्मचाऱ्यांना निवृत्तीशी संबंधित सर्व लाभ मिळतील.अतिरिक्त वेतन: सेवेच्या कालावधीनुसार, त्यांना सहा महिने ते दोन वर्षांपर्यंतचे वेतन देखील दिले जाईल.हा निर्णय अशा कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर आहे, जे दीर्घकाळ कंपनीशी जोडलेले आहेत आणि आता नवीन संधी किंवा निवृत्तीचा विचार करत आहेत. या कपातीमुळे आयटी क्षेत्रातील कौशल्य विकास आणि ऑटोमेशनचा वाढता प्रभाव पुन्हा एकदा दिसून आला आहे.
Web Summary : TCS plans to lay off 12,000 employees lacking required skills, offering severance packages based on tenure. Options include early retirement with benefits and additional pay. Those on the 'bench' receive three months' notice. The move reflects automation's impact.
Web Summary : टीसीएस ने आवश्यक कौशल की कमी वाले 12,000 कर्मचारियों को निकालने की योजना बनाई है, कार्यकाल के आधार पर विच्छेद पैकेज की पेशकश की है। विकल्पों में लाभ और अतिरिक्त वेतन के साथ प्रारंभिक सेवानिवृत्ति शामिल है। 'बेंच' पर रहने वालों को तीन महीने का नोटिस मिलेगा। यह कदम स्वचालन के प्रभाव को दर्शाता है।