Join us

... तर द्यावा लागणार १८ टक्के GST; गेस्ट लेक्चरर्ससाठी महत्त्वाची बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 20:38 IST

GST on Guest Lecture Income: जर तुम्ही कोणत्याही शैक्षणिक संस्थेत गेस्ट लेक्चरर म्हणून जात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

GST on Guest Lecture Income: जर तुम्ही कोणत्याही शैक्षणिक संस्थेत गेस्ट लेक्चरर म्हणून जात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आता येणाऱ्या काळात तुम्हाला गेस्ट लेक्चर्समधून मिळणाऱ्या कमाईवर १८ टक्के वस्तू आणि सेवा कर (GST) द्यावा लागणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार अॅडव्हान्स रुलिंग अथॉरिटीच्या (AAR) कर्नाटक खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

अर्जदार साईराम गोपालकृष्ण यांनी गेस्ट लेक्चरमधून मिळणारे उत्पन्न करपात्र सेवांमध्ये समाविष्ट आहे का याची चौकशी करण्यासाठी AAR कडे संपर्क साधला होता. अशा सेवा अन्य सेवा, तांत्रिक आणि व्यावसायिक सेवांच्या अंतर्गत येतात आणि सेवांच्या सूट असलेल्या श्रेणी अंतर्गत नाहीत, असं हा आदेश पारित करताना AAR ने सांगितलं आहे. अशा परिस्थितीत अशा सेवांवर १८ टक्के दराने जीएसटी भरावा लागणार असल्याचंही सांगण्यात आलं. एएआरच्या या आदेशाचा अर्थ असा आहे की ज्या सेवा व्यावसायिकांचे उत्पन्न २० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना गेस्ट लेक्चर्सच्या कमाईवर १८ टक्के GST भरावा लागेल.

"व्यवस्था अडचणीची ठरू शकेल""ही व्यवस्था लाखो फ्रीलांसर, संशोधक, प्राध्यापक आणि इतरांसाठी अडचणींची ठरू शकते. ते एक विशिष्ट मानधन घेत आपलं ज्ञान शेअर करतात," असं मत AMRG अँड असोसिएट्सचे वरिष्ठ भागीदार रजत मोहन यांनी व्यक्त केलं.

टॅग्स :जीएसटीभारत