Join us  

Tata Industries: रिलायन्सला टक्कर देणार, टाटा कंज्यूमर 5 बँडचे अधिग्रहण करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 8:09 PM

Bloomberg या वेबसाईने टाटा कंपनीकडून होत असलेल्या खरेदी आणि गुंतवणुकीसंदर्भात वृत्त दिले आहे.

मुंबई - उद्योगपती रतन टाटा यांच्या कॉन्गलोमरेट Tata Group च्या Tata Consumer Products Ltd. या कंपनीने बाजारात आपले मार्केट मूल्य वाढविण्यासाठी आता कंबर कसली आहे. कंपनीकडून मोठ्या प्रमाणात उद्योगवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. फूड अँड बेवरेज सेक्टरमधील टाटा कंज्यूमर या कंपनीने, मुकेश अंबानींच्या Reliance च्या बाजारातील मोठ्या प्रमाणात असलेल्या गुंतवणुकीमुळे अनेक कंपन्यांनाचे अधिग्रहणची योजना आखली आहे. विशेष म्हणजे कमीत कमी 5 ब्रँड्सच्या खरेदीची चर्चा रंगली आहे.  

Bloomberg या वेबसाईने टाटा कंपनीकडून होत असलेल्या खरेदी आणि गुंतवणुकीसंदर्भात वृत्त दिले आहे. टाटा कंन्ज्यूमर प्रोडक्टचे सीईओ सुनिल डिसुझा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, कंपनीकडून सध्या काही संभावित कंपन्यांसोबत गंभीरतेने चर्चा करत आहे. मात्र, सध्या टाटांच्या टार्गेटवर कोणत्या कंपन्या आहेत, हे त्यांनी सांगितले नाही. कंपनीसोबत येणाऱ्या आणि शक्य असलेल्या ब्रँड्ससोबत बोलणी सुरू आहे. या चर्चेवरुन बाजारातही उत्सुकता असल्याचं दिसून येत आहे. काही कंपन्यांचं ब्रँड व्हॅल्यू अधिक आहे. मात्र, सध्या लिक्विटीडी आणि बाजारातील दबाव पाहता या कंपन्याही अफॉर्डेबल असतील, असा विश्वासही डिसुझा यांनी व्यक्त केला.

दरम्यान, 153 वर्षे जुना ब्रँड असलेल्या टाटा समुहाने 2020 मध्ये कन्ज्युमर सेक्टरमध्ये टाटा कंन्ज्यूमरची सुरुवात केली. तेव्हापासून कंपनीने NourishCo Beverages Ltd. आणि Soulfull यांसारख्या कंपन्यांचे अधिग्रहण करुन कंपनीच्या पोर्टफोलियाचा विस्तार केला आहे. सध्या स्पर्धात्मक मार्केटध्ये कंपनीचा रस्ता सोपा नाही. कारण, टाटाचा सामना इंटरनेशनल ब्रँड Uniliver आणि मुकेश अंबानींच्या Reliance Industries Ltd सोबत होणार आहे.

टॅग्स :टाटारिलायन्सग्राहक