Join us  

TATA ची ‘पॉवर’बाज कामगिरी! २९ ₹चा शेअर गेला २३० वर; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 2:43 PM

TATA च्या या कंपनीने गुंतवणूकदारांना भन्नाट परतावा दिला असून, १ लाखाच्या गुंतवणुकीवर २४ लाखाचा थेट नफा झाल्याचे सांगितले जात आहे.

नवी दिल्ली: TATA ग्रुपच्या अंतर्गत आताच्या घडीला शेकडो कंपन्या कार्यरत आहेत. यातील अनेक कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत. केवळ भारतीय बाजारपेठेत नाही, तर शेअर बाजारातही दमदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. टाटा समूहातील एका कंपनीने कमाल कामगिरी केली आहे. केवळ २ वर्षात या कंपनीने तब्बल ८ पट रिटर्न दिले असून, गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 

टाटा समूहातील या कंपनीचे नाव TATA Power आहे. टाटा पॉवरच्या शेअर्सनी गेल्या २ वर्षातच जबरदस्त परतावा दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स २९ रुपयांवरून थेट २३० रुपयांवर पोहोचले आहेत. टाटा पॉवरच्या शेअर्सने गेल्या २ वर्षांत जवळपास ८ पटीने परतावा दिल्याचे सांगितले जात आहे. 

केवळ २ वर्षांत १ लाख रुपयाचे झाले ८ लाख

मुंबई शेअर बाजारात TATA पॉवरचे शेअर्स ०८ मे २०२० रोजी २८.२५ रुपयांच्या पातळीवर होता. हाच शेअर १७ मार्च २०२२ रोजी टाटा पॉवर कंपनीचा शेअर्स २३२.१० रुपयांच्या पातळीवर आहेत. एखाद्या व्यक्तीने ८ मे २०२० रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आताच्या घडीला हे पैसे ८.१४ लाख रुपये झाले असते. म्हणजेच ज्या गुंतवणूकदाराने पैसे गुंतवले असतील, त्याला २ वर्षांपेक्षा कमी कालावधीत ७ लाख रुपयांचा नफा झाला असेल, असे म्हटले जात आहे. 

दरम्यान, ४ ऑक्टोबर २००२ रोजी TATA पॉवरचा शेअर मुंबई शेअर बाजारात ९.१९ रुपयांच्या पातळीवर लिस्टेट झाला होता. आता टाटा पॉवरचा हाच शेअर २३०.२० रुपयांच्या पातळीवर आहेत. या कालावधीत कंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांना दोन हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. एखाद्या व्यक्तीने ४ ऑक्टोबर २००२ रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आता हे पैसे २५.०४ लाख रुपयांच्या जवळपास गेले असते. म्हणजेच गुंतवणुकीवर २४ लाख रुपयांचा थेट नफा झाला असता. विशेष म्हणजे टाटा पॉवरचे मार्केट कॅप सुमारे ७३ हजार ५८० कोटी रुपये आहे. 

टॅग्स :टाटारतन टाटाशेअर बाजार