Join us

टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स कंपनी बनणार ‘एफएमसीजी’, चेअरमन एन. चंद्रशेखरन यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 03:52 IST

फेब्रुवारीत या कंपन्यांचे विलीनीकरण झाले. त्यामुळे कंपनीला वृद्धीच्या व्यापक संधी मिळणार आहेत, असे चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.

कोलकता : टाटा ग्लोबल बेव्हरेजेस आणि टाटा केमिकल्स यांचे विलीनीकरण करून अलीकडेच स्थापन करण्यात आलेली ‘टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि.’ (टीसीपीएल) ही कंपनी परिपूर्ण एफएमसीजी कंपनी बनणार आहे, असे कंपनीचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.फेब्रुवारीत या कंपन्यांचे विलीनीकरण झाले. त्यामुळे कंपनीला वृद्धीच्या व्यापक संधी मिळणार आहेत, असे चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आभासी माध्यमातून संबोधित करताना चंद्रशेखरन यांनी म्हटले की, ‘टीसीपीएल’ने परिपूर्ण एफएमसीजी कंपनीत रूपांतरित होण्याचे तसेच जागतिक बाजारात नव्या संधी शोधण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवले आहे.अमेरिका, ब्रिटनमध्ये वाढविणार व्यवसायचंद्रशेखरन यांनी सांगितले की, टीसीपीएल व्यापक प्रमाणात ग्राहक वस्तूंची उत्पादने बाजारात आणणार आहे. वेष्टणांकित वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोक वस्तूंचा साठा करून ठेवत आहेत. आपली उत्पादने देशव्यापी पातळीवर उपलब्ध व्हावीत, यासाठी कंपनी आपली वितरण व्यवस्था मजबूत करणार आहे. अमेरिका आणि ब्रिटन या देशांतील आपला व्यवसाय वाढविण्याचाही कंपनीचा प्रयत्न आहे. 

टॅग्स :टाटाभारतव्यवसाय