Swiggy Toing App Launch : एकीकडे ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्यांनी चार्जेस वाढवल्याने जेवण ऑर्डर करणे महागले आहे. अशा परिस्थितीत स्विगी कंपनीने आपल्या ग्राहकांना स्वस्तात जेवण देण्यासाठी खास App लाँच केलं आहे. कमी बजेट असलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्विगीने एक नवीन ॲप आणले आहे. या ॲपचे नाव आहे 'Toing'. सध्या या ॲपची चाचणी केवळ पुणे शहरात केली जात आहे.
सध्या पुणे शहरातील कोथरूड, हिंजवडी, वाकड, औंध आणि पिंपळे सौदागर यांसारख्या निवडक भागांमध्ये हे ॲप वापरता येईल. कंपनीचा दावा आहे की, कमी बजेटमध्ये चांगले आणि विश्वासार्ह जेवण देऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी हे ॲप खास तयार करण्यात आले आहे.
५० रुपयांपासून मिळेल जेवणया ॲपद्वारे ग्राहक फक्त ५० रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यंतच्या किमतीचे जेवण मागवू शकतात. त्यामुळे कॉलेजमधील विद्यार्थी किंवा ज्यांचा पगार मर्यादित आहे अशा तरुण नोकरदारांसाठी हे ॲप एक उत्तम पर्याय ठरू शकते. 'झेप्टो कॅफे' आणि 'रॅपिडोच्या ओन्ली' सारख्या कंपन्यांशी वाढलेल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी स्विगीने हे नवीन पाऊल उचलले आहे.
वाचा - ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
पुणे शहरातच टेस्टिंग का?मिळालेल्या माहितीनुसार, स्विगी पहिल्यांदाच आपल्या मूळ ठिकाणाव्यतिरिक्त (बेंगलुरु वगळता) दुसऱ्या शहरात नवीन ॲपची चाचणी करत आहे. पुणे हे शिक्षण आणि आयटीचे मोठे केंद्र असल्यामुळे, तसेच ऑनलाइन फूड डिलिव्हरीच्या बाबतीत ते तुलनेने कमी विकसित बाजारपेठ असल्याने, कंपनीने टेस्टिंगसाठी या शहराची निवड केली आहे. या ॲपचा मुख्य उद्देश कमी उत्पन्न असलेल्या वर्गाला लक्ष्य करणे आहे.
'Toing' ॲपमध्ये ९९ रुपयांपेक्षा कमी किमतीच्या पदार्थांची यादी दिली असून, केवळ ३० मिनिटांत डिलिव्हरी केली जाते. या ॲपवर केक, बर्गर, पास्ता, पिझ्झा, बिर्याणी, डोसा यांसारखे पदार्थ उपलब्ध आहेत. स्विगीच्या मूळ ॲपमध्येही 'स्विगी ९९ स्टोअर' हा पर्याय उपलब्ध आहे, जिथे ९९ रुपयांपेक्षा कमी किमतीचे पदार्थ मिळतात.