Join us

Swiggy IPO Plans : फूड डिलिव्हरी कंपनी Swiggy देखील IPO आणण्याच्या तयारीत; 6,000 कोटी रुपये उभारण्याची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 16:27 IST

Swiggy IPO Plans: मीडिया रिपोर्ट्सनुसार, Swiggy ने ताज्या फंडिंग राउंडमध्ये आपले व्हॅल्युएशन 10.7 बिलियन डॉलर केले आहे, जे दुप्पट आहे.

नवी दिल्ली : झोमॅटोनंतर (Zomato) दुसरी फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीही (Swiggy) शेअर बाजारात लिस्टिंगची तयारी करत आहे. Swiggy कंपनी 800 मिलियन डॉलर म्हणजेच 6,000 कोटी रुपयांचा आयपीओ (IPO) आणण्याच्या तयारीत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Swiggy ने ताज्या फंडिंग राउंडमध्ये आपले व्हॅल्युएशन 10.7 बिलियन डॉलर केले आहे, जे दुप्पट आहे. Swiggy ला फूड डिलिव्हरी न करता एक लॉजिस्टिक कंपनी म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करायचे आहे. कंपनीने आयपीओ आणण्यापूर्वी स्वतंत्र संचालकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, Swiggy ही एक सॉफ्टबँक ग्रुप्स समर्थित कंपनी आहे.

2021 मध्ये, Swiggy ची प्रतिस्पर्धी कंपनी Zomato शेअर बाजारात लिस्ट झाली, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, Zomato ने लिस्टिंगनंतर अत्यंत निराशाजनक कामगिरी दर्शविली आहे. Zomato चा आयपीओ 76 रुपये प्रति शेअर या भावाने आला, जो 169 रुपयांवर गेल्यानंतर आता 80 रुपयांच्या जवळ व्यवहार करत आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या ऑर्डर व्हॅल्यूच्या वाढीने निराशा केली आहे. 

Swiggy आणि Zomato च्या विक्रीची तुलना करताना, Swiggy ने डिसेंबर महिन्यात 250 मिलियन डॉलरची विक्री दाखविली आहे तर Zomato ने ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत 733 मिलियन डॉलरची विक्री दर्शविली आहे. भारतातील फूड डिलिव्हरी व्यवसाय असो, किराणा डिलिव्हरी व्यवसायाने कोरोना महामारीच्या काळात प्रचंड वाढ दर्शविली आहे. 

Swiggy ने क्विक कॉमर्स डिलिव्हरी सेगमेंटमध्ये (Quick Commerce Delivery) पाऊल ठेवले आहे, ज्यामध्ये टाटा समूहाच्या बिग बास्केट, रिलायन्स इंडस्ट्रीज-समर्थित Dunzo द्वारे आव्हान दिले जात आहे.

टॅग्स :स्विगीव्यवसायशेअर बाजार