नवी दिल्ली- मुलीच्या भविष्याची चिंता आई-वडिलांना नेहमीच सतावते. मुलीला चांगलं शिक्षण आणि अनेक सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारही प्रयत्नशील असते. सरकार मुलींसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवते. विशेष म्हणजे त्याच योजनांमध्ये सुकन्या समृद्धी योजना ही खास आहे. या योजनेंतर्गत आपली मुलगी 10 किंवा त्याहून कमी वयाची असल्यास पोस्टात जाऊन तिच्या नावे खातं उघडू शकता. तसेच मुलगी 21 वर्षांची झाल्यावर ते पैसे आपल्याला व्याजासहीत परत मिळतात. मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या विवाहाच्या तरतुदीसाठी अल्पबचतीस प्रोत्साहन देण्याकरिता डिसेंबर 2014मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. मुलींच्या घटत्या जन्मदराची चिंता सतावत असताना त्यांच्या उत्कर्षासाठी काढण्यात आलेल्या सुकन्या योजनेचाही ग्राहकांनी भरभरून लाभ घेतला. सरकारनं या योजनेंतर्गत मिळणारे व्याजदर वाढवून 9.1 टक्के केले आहे. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत आपण फक्त 250 रुपयांमध्ये खातं उघडू शकतो. ज्यासाठी पहिल्यांदा 1000 रुपये मोजावे लागत होते. आपल्यालाही जर मुलगी असेल तर केंद्राची ही योजना भरपूर फायदेशीर ठरू शकते. अशी आहेत उद्दिष्ट्ये - जन्मापासून ते 10 वर्षं वयोगटातील मुलींची खाती या योजनेंतर्गत उघडता येते. दाम्पत्याला दोन मुलींपर्यंत या योजनेत भाग घेता येऊ शकते. कमीत कमी 250 रुपये व अधिकाधिक दीड लक्ष रुपये एका वित्तीय वर्षात मुलीच्या खात्यामध्ये जमा करता येऊ शकते. यावर शासनाकडून 9.2 टक्के दराने व्याज दिले जाते. खातेधारकाची किंवा मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर शिक्षण किंवा विवाहप्रसंगी खर्चाची पूर्तता पूर्ण करण्यासाठी पूर्ण रकमेपैकी 50 टक्के रक्कम काढता येते. 21 वर्षे वय पूर्ण झाल्यावर खाते परिपक्व झाले असे नमूद आहे.कुठे उघडू शकतो खातं- मुलीच्या जन्मापासून ती दहा वर्षांची होईपर्यंत, कुठल्याही टपाल कार्यालयात किंवा कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत, तिचे जन्म प्रमाणपत्र सादर करून केवळ एक हजार रुपयांच्या ठेवीवर पालक हे खाते उघडू शकतात.
पोस्टात उघडलं जातं मुलींसाठी हे खास खातं, जमा होणार 40 लाखांचा फंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 08:47 IST