Success Story: संघर्ष हीच यशाची गुरुकिल्ली आहे, हे पीसी मुस्तफा (PC Musthafa) यांच्या जीवनप्रवासातून दिसून येतं. कर्नाटकातील एका छोट्या गावात एका हमालाच्या पोटी जन्मलेल्या मुस्तफा यांनी गरिबी आणि अनेक समस्यांवर मात करत आज 'आयडी फ्रेश फूड' (iD Fresh Food) या ४,५०० कोटी रुपयांच्या कंपनीचं साम्राज्य उभं केलं आहे. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास आज लाखो तरुणांसाठी एक आदर्श बनला आहे.
गरिबीतून IIT आणि कॉर्पोरेट करिअर
पीसी मुस्तफा यांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेलं. कुटुंबाचं उत्पन्न मर्यादित असूनही त्यांनी शिक्षणाशी कधीही तडजोड केली नाही. गणितातील त्यांची आवड आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी आयआयटी मद्रासमध्ये (IIT Madras) प्रवेश मिळवला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केली. मात्र, स्वतःचं काहीतरी वेगळं करण्याची आणि लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी, MCX वर २.४९ लाखांच्या पार, गुंतवणूक करावी की नफा वसूल करावा?
इडली-डोसा पिठापासून व्यवसायाची सुरुवात
२००५ मध्ये पीसी मुस्तफा यांनी आपल्या मित्रांच्या मदतीनं बंगळुरूमध्ये एका ५० स्क्वेअर फुटांच्या छोट्या किचनमधून 'आयडी फ्रेश फूड'ची सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्याकडे फक्त एक मिक्सर, एक ग्राइंडर आणि एक जुनी स्कूटर होती. घरगुती चवीचं, ताजं आणि कोणत्याही केमिकलशिवाय इडली-डोसा बॅटर (पीठ) ग्राहकांपर्यंत पोहोचवणं हा त्यांचा साधा विचार होता. गुणवत्तेमुळे या ब्रँडवर लोकांचा विश्वास बसला आणि व्यवसायाचा विस्तार होत गेला. आज ही कंपनी केवळ पिठापुरती मर्यादित नसून पराठा, चपाती, वडा बॅटर आणि दुग्धजन्य पदार्थही तयार करते.
विदेशी गुंतवणूक आणि ४,५०० कोटींचं मूल्य
कंपनीच्या दमदार कामगिरीमुळे अनेक मोठे गुंतवणूकदार आकर्षित झाले आहेत. प्रेमजी इन्व्हेस्ट आणि TPG न्यूक्वेस्ट यांच्यानंतर आता लंडनच्या एपेक्स पार्टनर्स (Apax Partners) या फर्मनं कंपनीत ३५ टक्क्यांहून अधिक हिस्सा खरेदी केला आहे. हा व्यवहार १,५०० कोटी रुपयांहून अधिक किमतीचा असून, यामुळे कंपनीचं एकूण मूल्यांकन आता ४,५०० कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
भविष्यातील विस्तार
एपेक्स पार्टनर्सच्या या गुंतवणुकीनंतर, कंपनी आता भारत आणि आखाती देशांमध्ये (Gulf countries) आपला व्यवसाय अधिक विस्तारण्याच्या तयारीत आहे. नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यासोबतच उत्पादनांची श्रेणी वाढवण्यावरही कंपनीचा भर असणार आहे. पीसी मुस्तफा यांची कहाणी दाखवते की परिस्थिती कशीही असो, मोठी दृष्टी आणि प्रामाणिक परिश्रमानं, एका हमालाचा मुलगाही कोट्यवधी रुपयांची कंपनी उभारू शकतो.
Web Summary : From humble beginnings, PC Musthafa built iD Fresh Food, a ₹4,500 crore company. Starting with idli-dosa batter, the company expanded. Apax Partners' ₹1,500 crore investment fuels further growth in India and Gulf countries.
Web Summary : पीसी मुस्तफा ने गरीबी से संघर्ष कर ₹4,500 करोड़ की iD फ्रेश फूड कंपनी बनाई। इडली-डोसा बैटर से शुरुआत की। Apax पार्टनर्स के ₹1,500 करोड़ के निवेश से भारत और खाड़ी देशों में विस्तार होगा।