Join us
Daily Top 2Weekly Top 5

Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांनी घसरला; Hindalco-Indigo टॉप लूझर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 10:00 IST

Stock Markets Today: गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजारासाठी जागतिक बाजारातील कल संमिश्र पाहायला मिळाला. यामुळे भारतीय बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली.

Stock Markets Today: गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजारासाठी जागतिक बाजारातील कल संमिश्र पाहायला मिळाला. यामुळे भारतीय बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. मेटल, रियल्टी आणि फार्मा क्षेत्रातील विक्रीमुळे बाजारावर दबाव दिसून आला.

सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स १५० अंकांनी तर निफ्टी ७० अंकांनी घसरला होता. बँक निफ्टीही फ्लॅट होता, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही किंचित घसरणीसह व्यवहार करत होते. ऑईल अँड गॅस आणि एफएमसीजी (FMCG) क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराला काहीसा आधार मिळाला. तसंच आयटी आणि पीएसयू बँक क्षेत्रातही तेजी दिसून आली. सकाळी ९:२५ च्या सुमारास सेन्सेक्स २८२ अंकांच्या घसरणीसह ८३,५३४ वर, तर निफ्टी १०० अंकांनी घसरून २५,६७० वर व्यवहार करत होता. बँक निफ्टी ५० अंकांच्या घसरणीसह ६०,१९० वर होता.

मुकेश अंबानींचा सल्ला : फक्त सोन्या-चांदीत गुंतवणूक नको; म्हणाले, "आर्थिक प्रगतीत..."

आजचे वधारलेले आणि घसरलेले शेअर्स

निफ्टी ५० वर हिंदाल्को, इंडिगो, ट्रेंट, टाटा स्टील, श्रीराम फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील आणि बीईएल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. तर दुसरीकडे, हिंदुस्थान युनिलिव्हर, महिंद्रा अँड महिंद्रा, ओएनजीसी, कोल इंडिया, विप्रो, एनटीपीसी आणि एसबीआय यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली.

जागतिक बाजारातील घडामोडी

अमेरिकन बाजारात काल मोठी चढ-उतार पाहायला मिळाली. डाओ जोन्स ४०० अंकांच्या रिकव्हरीसह २६० अंकांनी वधारला, परंतु टेक शेअर्समधील मोठ्या विक्रीमुळे नॅस्डॅक (Nasdaq) अडीच महिन्यांच्या नीचांकी स्तराला स्पर्श करून ३५० अंकांनी घसरून बंद झाला. गिफ्ट निफ्टी २५,८५० च्या आसपास स्थिर होता, तर डाओ फ्युचर्समध्येही संथ हालचाल दिसली.

इराणला धमकी आणि कच्च्या तेलात उसळी

डोनाल्ड ट्रम्प यांनी करार न झाल्यास इराणवर हल्ल्याची धमकी दिली आहे. या भू-राजकीय तणावामुळे कच्च्या तेलाचे दर ४ टक्क्यांनी उसळून ६९ डॉलरवर पोहोचलेत. तसंच, डॉलर मजबूत झाल्यामुळे तांब्यासह इतर सर्व बेस मेटल्समध्ये घसरण नोंदवण्यात आली.

सोने आणि चांदीच्या दरात मोठी अस्थिरता दिसून आली. देशांतर्गत बाजारात सोनं दिवसाच्या उच्चांकी स्तरावरून सुमारे ७,००० रुपयांनी घसरून १ लाख ५३ हजार रुपयांच्या आसपास आलं. चांदीदेखील दिवसाच्या उच्चांकी स्तरावरून २६,००० रुपयांनी घसरून २ लाख ६८ हजार ८५० रुपयांवर बंद झाली. मात्र, जागतिक बाजारपेठेत सोन्यात १०० डॉलरची वाढ झाली असून चांदीमध्ये ७ टक्क्यांची मोठी उसळी पाहायला मिळाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Stock market opens lower; Nifty down 70 points; Hindalco top loser

Web Summary : Indian stock market started Thursday with a decline amid mixed global cues. Metal, realty, and pharma sectors faced selling pressure. Hindalco and Indigo were top losers, while FMCG stocks gained some ground. Gold and silver saw volatility.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक