Join us

Stock Market Today: शेअर बाजारात चढ-उतार सुरुच; IT Stocks मध्ये घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 10:05 IST

Stock Market Today: जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (७ मार्च) देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात रेड झोनमध्ये झाली. निफ्टी २२,४६० च्या आसपास गेला.

Stock Market Today: जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (७ मार्च) देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात रेड झोनमध्ये झाली. निफ्टी २२,४६० च्या आसपास गेला. पण त्यानंतर काही सेकंदातच तो पुन्हा खालच्या पातळीपेक्षा १०० अंकांनी वर गेला आणि २२,५६० च्या आसपास गेला. मात्र त्यानंतर त्यात पुन्हा घसरण झाली. सेन्सेक्सही जवळपास २०० अंकांनी घसरला, परंतु नंतर त्यात तेजी आली आणि काही वेळातच परत त्यात घसरण झाली. बँक निफ्टी ४८,६०८ च्या आसपास सपाट व्यवहार करत होता. नॅसडॅकवरील घसरणीमुळे आयटी शेअर्स कमकुवत होते.कामकाजाच्या सुरुवातीला सेन्सेक्स मागील बंदच्या तुलनेत ७ अंकांनी वधारून ७४,३४७ वर उघडला. निफ्टी ३६ अंकांनी घसरून २२,५०८ वर तर बँक निफ्टी १६४ अंकांनी घसरून ४८,४६३ वर उघडला. रुपया ८७.१२ रुपये प्रति डॉलरवर स्थिरावला. निफ्टीवर बीईएल, एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ, हीरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. तर दुसरीकडे इन्फोसिस, श्रीराम फायनान्स, एचसीएल टेक, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले.

गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजाराबाबत काही विधानं केली, ज्यामुळे तणाव वाढू शकतो. टॅरिफ वॉरच्या टेन्शनमध्ये काल अमेरिकन बाजारात पुन्हा घसरण झाली. दरम्यान, डाऊ ४०० अंकांनी घसरला, तर नॅसडॅक जवळपास ५०० अंकांनी घसरून ५ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. नॅसडॅक फेब्रुवारीच्या उच्चांकी पातळीवरून १० टक्क्यांनी घसरला आहे.अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिकोतील आणखी काही उत्पादनांवरील शुल्क २ एप्रिलपर्यंत पुढे ढकलले असले तरी चीनला कोणताही दिलासा दिलेला नाही. आम्ही शेअर बाजारातील घसरणीवर लक्ष केंद्रित करत नाही, शुल्कामुळे अमेरिकन मजबूत होईल, असं ट्रम्प म्हणाले.

टॅग्स :शेअर बाजार