Join us

Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 09:46 IST

Stock Market Today: शेअर बाजारात आज सलग चौथ्या दिवशी विक्री दिसून आली. सेन्सेक्सनं आज २७१ अंकांच्या घसरणीसह व्यवहार सुरू केला आहे.

Stock Market Today: शेअर बाजारात आज सलग चौथ्या दिवशी विक्री दिसून आली. सेन्सेक्सनं आज २७१ अंकांच्या घसरणीसह व्यवहार सुरू केला आहे. सुरुवातीच्या व्यवहारात आयटी आणि मेटल क्षेत्रात घसरण दिसून येत आहे. निफ्टी ७१ अंकांनी कमकुवत होऊन २४,६०९ वर उघडला. बँक निफ्टी २०३ अंकांनी घसरून ५५,८८१ वर उघडला. रुपया ८६.६७ च्या तुलनेत ८६.८३/ डॉलर्सवर वर उघडला.

भारतीय शेअर बाजारात ३० मे नंतर परदेशी गुंतवणूकदारांनी (एफआयआय) सर्वात मोठी विक्री केली आहे. सोमवारी, एफआयआयंनी रोख, इंडेक्स फ्युचर्स आणि स्टॉक फ्युचर्समध्ये एकूण ५,१०० कोटी रुपयांची विक्री केली. तर दुसरीकडे, देशांतर्गत फंड्स सलग १६ व्या दिवशी खरेदीदार राहिले आणि त्यांनी सुमारे ६,८०० कोटी रुपयांची मोठी खरेदी केली. यावरून असं दिसून येतंय की देशांतर्गत गुंतवणूकदार बाजारातील घसरणीकडे खरेदीची संधी म्हणून पाहत आहेत.

FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

औद्योगिक उत्पादन १० महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

जून महिन्यात देशाचे औद्योगिक उत्पादन (IIP) आकडे कमकुवत राहिले. मे महिन्यात आयआयपी वाढ ४.९ टक्के होती, जी जूनमध्ये फक्त १.५ टक्के झाली. गेल्या १० महिन्यांतील ही सर्वात कमी पातळी आहे. खाण क्षेत्रातील नकारात्मक वाढ आणि उत्पादन क्षेत्रातील मंदी यामुळे या घसरणीत महत्त्वाची भूमिका बजावली. हे आर्थिक बाबींमधील स्थिरतेचं लक्षण आहे, जे भविष्यात धोरणांवर परिणाम करू शकते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्धावर कडक भूमिका घेतली आहे आणि शांतता करार करण्यासाठी रशियाला फक्त १० ते १२ दिवसांचा वेळ दिला आहे. ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली. कच्च्या तेलाच्या किमतीत २.५ टक्क्यांनी वाढ झाली आणि ती प्रति बॅरल ६९ डॉलर्सच्या पुढे गेली. उलट, सोन्याचा भाव २५ डॉलर्सनं घसरून सुमारे ३३७० डॉलर्सवर आला, तर चांदीमध्ये थोडीशी घसरण झाली.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक