Stock Market Today: तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज मंगळवारी (२७ जानेवारी) शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. सुरुवातीला सेन्सेक्स ९५ अंकांच्या वाढीसह ८१,६३२ वर, तर निफ्टी ५० अंकांच्या वाढीसह २५,०९७ वर व्यवहार करत होता. बँक निफ्टीमध्येही ९० अंकांची वाढ दिसून आली. मात्र, त्यानंतर बाजारात अचानक घसरण झाली आणि सुरुवातीची वाढ नफ्यात बदलली. व्होलॅटिलिटी इंडेक्स १३% नं वधारला, ज्यामुळे निफ्टी ११० अंकांनी आणि सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली घसरला. मेटल शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली, तर ऑटो शेअर्समध्ये विक्रीचा दबाव होता. मात्र यानंतर पुन्हा तेजीचं सत्र दिसून आलं.
ओपनिंगची पातळी आणि रुपयाची स्थिती
आज बाजार उघडताना सेन्सेक्स १०१ अंकांनी घसरून ८१,४३६ वर खुला झाला. निफ्टीमध्ये १५ अंकांची किरकोळ वाढ होऊन तो २५,०६३ वर उघडला, तर बँक निफ्टी १०७ अंकांनी घसरून ५८,३६६ वर उघडला. चलन बाजारात रुपया १८ पैशांनी मजबूत झाला असून तो ९१.७६/ डॉलर्सवर उघडला.
भारत-EU व्यापार करार आणि जागतिक संकेत
जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळत असले तरी, 'भारत-EU FTA' करारामुळे गिफ्ट निफ्टीमध्ये १०० अंकांपेक्षा जास्त तेजी दिसून आली. एकीकडे सोनं आणि चांदीनं नवनवीन उच्चांकी स्तर गाठले असतानाच, दुसरीकडे भारत-EU व्यापार करार आणि अमेरिकेकडून मिळणारे सकारात्मक संकेत यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे.
ऐतिहासिक व्यापार कराराची घोषणा
आज भारत आणि युरोपियन युनियन (EU) दरम्यान ऐतिहासिक व्यापार कराराची घोषणा होऊ शकते. वाणिज्य मंत्र्यांची पत्रकार परिषद संध्याकाळी ४:३० वाजता होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारत युरोपियन गाड्यांवरील आयात शुल्क ११०% वरून ४०% पर्यंत कमी करू शकतो. या करारामुळे इक्विटी, करन्सी आणि कमोडिटी बाजारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेकडून दिलासा मिळण्याचे संकेत
व्यापार आघाडीवर भारताला अमेरिकेकडूनही दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत. अमेरिकेनं भारतावरील २५% अतिरिक्त टॅरिफ हटवण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी रशियाकडून तेल खरेदी कमी करण्याच्या बदल्यात सवलत देण्याचे संकेत दिलेत. व्यापार क्षेत्रातील या घडामोडींमुळे बाजाराचा मूड सुधारताना दिसत आहे.
GIFT निफ्टी आणि अमेरिकन बाजार
गिफ्ट निफ्टी सुमारे १०० अंकांच्या वाढीसह २५,१७५ च्या जवळ होता. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी डाऊ फ्युचर्स १५० अंकांनी खाली होते. अमेरिकन बाजारात चढ-उतारांनंतरही मजबुती दिसून आली. डाऊ जोन्स दोन दिवसांत ३० अंकांनी तर नॅस्डॅक सलग चौथ्या दिवशी तेजीसह दोन दिवसांत १६५ अंकांनी वधारला आहे.
Web Summary : Stock market seesawed after a positive start, dragged by volatility. India VIX surged 13%. Metal shares gained, while auto shares faced selling pressure amidst India-EU trade deal hopes and positive global cues. US rate updates also played a role.
Web Summary : तेजी के साथ शुरुआत के बाद शेयर बाजार में भारी उतार-चढ़ाव देखा गया। भारत VIX 13% बढ़ा। धातु शेयरों में खरीदारी हुई, जबकि ऑटो शेयरों पर दबाव रहा। भारत-यूरोपीय संघ व्यापार समझौते की उम्मीदों और वैश्विक संकेतों का असर रहा।