Join us

Stock Market Today: शेअर बाजार सुस्साट... १६९५ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex; मेटल, रियल्टी शेअर्समध्ये बंपर वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 09:58 IST

Stock Market Today: शेअर बाजाराने आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी जोरदार सुरुवात केली आहे. सेन्सेक्स १६९५ अंकांनी वधारून ७६,८५२ वर उघडला.

Stock Market Today: शेअर बाजाराने आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी जोरदार सुरुवात केली आहे. सेन्सेक्स १६९५ अंकांनी वधारून ७६,८५२ वर उघडला. निफ्टी ५४० अंकांनी वधारून २३,३६८ वर खुला झाला. बँक निफ्टी १२९७ अंकांच्या वाढीसह ५२,२९९ वर उघडला. तर दुसरीकडे रुपया ८६.०४ च्या तुलनेत ८५.८८/डॉलरवर उघडला. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये १ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचे झालं तर निफ्टी मेटल आणि रियल्टी देखील १ टक्क्यांपेक्षा जास्त तेजीसह व्यवहार करताना दिसत आहेत. आज जवळपास सर्वच क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये खरेदी दिसून आली.

कामकाजादरम्यान टाटा मोटर्स, महिंद्रा, एचडीएफसी बँक आणि एल अँड टीमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. तर दुसरीकडे हिंदुस्तान युनिलिव्हर आणि नेस्ले इंडियामध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली.

यामुळे तेजी

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसह इतर देशांतून येणाऱ्या सेमीकंडक्टर, स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर लादलेले शुल्क हटवण्याची घोषणा केली आहे. या वस्तूंवरील नवं शुल्क नंतर जाहीर केले जाईल, असं ट्रम्प यांनी म्हटलंय. फार्मा क्षेत्रावर ही शुल्क लादण्याची तयारी आहे, जी एक-दोन महिन्यात लागू होऊ शकते. ट्रम्प यांच्या नरमाईच्या भूमिकेनंतर अमेरिकेच्या शेअर बाजारात प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या दोन ट्रेडिंग सेशनमध्ये डाऊ जोन्स ९३० अंकांनी वधारला आहे, तर नॅसडॅक ४५० अंकांनी वधारला आहे.

बाजारावर परिणाम

या सकारात्मक संकेताचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून आला. गिफ्ट निफ्टी ४०० अंकांनी वधारून २३,३०० वर पोहोचला. त्याचबरोबर निक्केईमध्येही ४०० अंकांची वाढ झाली असली तरी डाऊ फ्युचर्समध्ये ५० अंकांची किरकोळ घसरण दिसून आली. शुक्रवारी देशांतर्गत बाजारात सोन्यानं ९३,९४० रुपयांची विक्रमी पातळी गाठली, तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं ३,२६३ डॉलरवर पोहोचल्यानंतर हलक्या नफावसुलीसह ३,२२५ डॉलरच्या आसपास व्यवहार करत होतं. गोल्डमन सॅक्सला वर्षाच्या अखेरीस सोन्याचे दर १.३० लाख रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. तर, चांदी सलग सहाव्या दिवशी वाढून ३२ डॉलरवर पोहोचलीये.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक