टाटा समूहातील कंपनी तेजस नेटवर्क्सच्या (Tejas Networks) शेअर्समधील सातत्याने घसरण होताना दिसत आहे. हा शेअर मंगळवारी बीएसईवर (BSE) २.५० टक्क्यांनी घसरत २९६.४५ रुपयांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान या शेअरने २९४.१० रुपयांची पातळी गाठत ५२ आठवड्यांचा नवा नीचांक नोंदवला केला. महत्वाचे म्हणजे, हा शेअर ऑल टाइम हायवरून ८० टक्क्यांनी घसरत आपल्या उच्चांकावरून तब्बल ८० टक्क्यांहून अधिक घसरला आहे.
हा शेअर २७ जून २०२४ रोजी १४९५.१० रुपयांवर होता, तो आता 296.45 रुपयांवर आला आहे. अर्थात ३०० रुपयांच्याही खाली आला आहे. या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या मूल्यांत ३४ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांचा विचार केल्यास या शेअरने ११२ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या एका वर्षात शेअरमध्ये ६७ टक्क्यांची घसरण झाली असून, सहा महिन्यांत तो सुमारे ४९ टक्क्यांनी घसरला आहे.
दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी या कंपनीतून ९७५ टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा कमावला आहे. जून २०२० मध्ये त्यांनी १.५२ टक्के हिस्सा खरेदी करून गुंतवणूक सुरू केली होती. सप्टेंबर २०२० पर्यंत त्यांचा वाटा ४.२ टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी सातत्याने आपला हिस्सा कमी करण्यास सुरुवात केली. मार्च २०२५ मध्ये त्यांची हिस्सेदारी केवळ १.०२ टक्के उरली होती.(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
Web Summary : Tejas Networks share price declined, hitting a 52-week low. It's down over 80% from its all-time high. Despite past gains, the stock has significantly fallen this year and in the last year. Investor Vijay Kedia reduced his stake after a multi-bagger return.
Web Summary : तेजस नेटवर्क्स के शेयर की कीमत में गिरावट, 52 सप्ताह के निचले स्तर पर। यह अपने सर्वकालिक उच्च स्तर से 80% से अधिक नीचे है। पिछले लाभ के बावजूद, स्टॉक इस साल और पिछले साल काफी गिर गया है। निवेशक विजय केडिया ने मल्टीबैगर रिटर्न के बाद अपनी हिस्सेदारी कम कर दी।