Stock Market Today: दोन दिवसांच्या तेजीनंतर गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात कमकुवत झाली आहे. सेन्सेक्स, निफ्टी आणि बँक निफ्टी हे तिन्ही प्रमुख निर्देशांक रेड झोनमध्ये उघडले. सुरुवातीला सेन्सेक्स २५० अंकांनी तर निफ्टी ७० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. बँक निफ्टीमध्येही १७० अंकांची घट पाहायला मिळाली. सुरुवातीच्या व्यवहारात बाजार इंट्राडे नीचांकी स्तरावरून सावरताना दिसला, तरीही व्यवहार रेड झोनमध्येच सुरू होते. दरम्यान, इंडिया VIX १.२३% वर होता, तर स्मॉलकॅप शेअर्समध्ये आज चांगली तेजी दिसून आली.
क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती आणि टॉप गेनर्स
सेक्टोरल इंडेक्सचा विचार केल्यास मेटल, रियल्टी, ऑईल अँड गॅस निर्देशांकात खरेदी दिसून आली. मात्र, आयटी, ऑटो, FMCG, खाजगी बँका, हेल्थकेयर, फार्मा आणि NBFC यांसारख्या इतर सर्व क्षेत्रांत घसरण नोंदवण्यात आली. निफ्टी ५० वर L&T, Hindalco, Tata Steel, Power Grid, JSW Steel, NTPC आणि Coal India हे प्रमुख वधारेलेले शेअर्स होते. याउलट Maruti, Dr Reddy, Asian Paint, Titan, HUL, TCS आणि Tata Consumer या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली.
जागतिक संकेत, कच्च्या तेलाचा परिणाम
जागतिक आणि देशांतर्गत अशा दोन्ही पातळ्यांवर सध्या काहीशी चिंतेची परिस्थिती आहे. सोन्या-चांदीतील विक्रमी तेजी, मध्यपूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि अमेरिकन फेडच्या भूमिकेनंतर जागतिक बाजारपेठांमधून संमिश्र संकेत मिळत आहेत. GIFT निफ्टीमध्येही कमकुवतपणा दिसून येत असल्यानं बाजाराच्या सुरुवातीला चढ-उतार राहण्याची शक्यता आहे.
अमेरिकन फेडचा व्याजदरांबाबतचा निर्णय
सलग तीन वेळा कपात केल्यानंतर, अमेरिकन फेडनं यावेळी व्याजदर स्थिर ठेवले आहेत. फेडचे अध्यक्ष पॉवेल यांनी नमूद केलं की, विकासाचा दृष्टिकोन मजबूत आहे, परंतु महागाईबाबत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. याचा परिणाम म्हणून S&P 500 निर्देशांक इंट्राडेमध्ये ऐतिहासिक उच्चांकाला स्पर्श केल्यानंतर फ्लॅट बंद झाला. नॅस्डॅक सुमारे ४० अंकांनी वधारून तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, तर डाओ जेन्स केवळ १२ अंकांच्या वाढीसह दिवसाच्या नीचांकी स्तरावर बंद झाला.
Web Summary : Indian stock market started weak Thursday. Sensex fell 250 points, Nifty 70. Metals and realty saw buying. Global cues mixed amid inflation concerns.
Web Summary : भारतीय शेयर बाजार गुरुवार को कमजोर शुरुआत हुई। सेंसेक्स 250 अंक और निफ्टी 70 अंक गिरा। धातु और रियलिटी में खरीदारी देखी गई। वैश्विक संकेत मुद्रास्फीति की चिंताओं के बीच मिश्रित रहे।