Join us

Stock Market: सेन्सेक्सनं मारली डबल सेन्चुरी, निफ्टी २३,७०० च्या वर उघडला; ऑटो शेअर्समध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 09:49 IST

Stock Marke Opening : गुरुवारी (२ जानेवारी २०२५) निफ्टीच्या विकली एक्सपायरीनंतर देशांतर्गत शेअर बाजार चांगल्या तेजीसह उघडले. सेन्सेक्स २०० अंकांनी वधारून उघडला.

Stock Marke Opening : गुरुवारी (२ जानेवारी २०२५) निफ्टीच्या विकली एक्सपायरीनंतर देशांतर्गत शेअर बाजार चांगल्या तेजीसह उघडले. सेन्सेक्स २०० अंकांनी वधारून उघडला. तर निफ्टीही ५० अंकांनी वधारला आणि २३,८०० च्या आसपास व्यवहार करत होता. बँक निफ्टी ७० अंकांनी वधारून ५१,१४६ च्या आसपास होता. मिडकॅप-स्मॉलकॅप निर्देशांकातही खरेदी दिसून आली.

ऑटो आणि एनबीएफसी शेअर्समधील तेजीमुळे बाजाराला सपोर्ट मिळत होता. खासगी बँकांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. त्याचवेळी कन्झुमर ड्युरेबल्स हा एकमेव निर्देशांक रेड झोनमध्ये व्यवहार करत होता. अशोक लेलँड, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती, टाटा मोटर्स या कंपन्यांचे शेअर्स वधारले. निफ्टीवर कोटक बँक, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, डॉ. रेड्डी, श्रीराम फायनान्स मध्ये तेजी होती. तर विप्रो, अदानी एंटरप्राइझ, बजाज ऑटो, अदानी पोर्ट्स, एनटीपीसीमध्ये घसरण झाली.

एकंदरीत विकली एक्सपायरीवर निफ्टीची सुरुवात ग्रीन झोनमध्ये झाली. सेन्सेक्स मागील बंदच्या तुलनेत १५० अंकांनी वधारून ७८,६५७ वर उघडला. निफ्टी ४१ अंकांनी वधारून २३,७८३ वर आणि बँक निफ्टी २४ अंकांनी वधारून ५१,०८४ वर उघडला. दुसरीकडे, रुपया ८५.७० रुपये प्रति डॉलरच्या नव्या नीचांकी पातळीवर उघडला.

सकाळी जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळाले. सुट्ट्यांनंतर आजपासून जागतिक बाजारपेठा सुरू होतील. पण यादरम्यान गिफ्ट निफ्टी जवळपास ५० अंकांनी घसरून २३८५० च्या व्यवहार करत होता होता. डाऊ फ्युचर्स मंदावला असला तरी जपानचा निक्केई आजही बंद आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक