Share Market Today: मंगळवारी जागतिक संकेतांदरम्यान देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात फ्लॅट राहिली. सकाळच्या सुमारास बीएसई सेन्सेक्स ३४.०९ अंकांच्या वाढीसह ८१,८१९.८३ वर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे एनएसई निफ्टी ८.६५ अंकांच्या किरकोळ वाढीसह २५,०७७.८५ वर व्यवहार करत होता. आजच्या व्यापार सत्रात निफ्टीमध्ये कोटक महिंद्रा बँक, एल अँड टी, अॅक्सिस बँक, हिरो मोटोकॉर्प आणि बजाज फिनसर्व्हच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत होती. त्याच वेळी टायटन कंपनी, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, एशियन पेंट्स, टाटा कंझ्युमर आणि जिओ फायनान्शियलचे शेअर्स कमकुवत दिसत होते.
आशियाई बाजारांमध्ये संमिश्र कल
या वर्षी फेडरल रिझर्व्हकडून पहिल्यांदा व्याजदर कपात होण्याची शक्यता असल्यानं मंगळवारी आशियाई शेअर बाजारांवर संमिश्र परिणाम झाले. वॉल स्ट्रीटवर नवीन विक्रम प्रस्थापित झाल्यानंतर, काही आशियाई बाजारांमध्ये तेजी दिसून आली, तर काही इतर बाजार कमकुवत राहिले. पीटीआयच्या वृत्तानुसार, जपानच्या बाजारात सर्वाधिक तेजी दिसून आली. सुट्टीनंतर उघडताना, जपानचा प्रमुख निर्देशांक निक्केई २२५ ४५,००० च्या ऐतिहासिक पातळीजवळ पोहोचला. सकाळच्या व्यवहारात तो ०.३% वाढीसह ४४,९०४.१३ वर होता.
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा S&P/ASX 200 निर्देशांक ०.२% नं वाढून ८,८७१.३० वर बंद झाला. तर दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक १.१% वाढून ३,४४६.१३ वर बंद झाला. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक ०.२% घसरून २६,३८४.९५ वर बंद झाला. तर चीनचा शांघाय कंपोझिट देखील ०.४% घसरून ३,८४६.६१ वर बंद झाला.