मुंबई : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावाचा फटका गुरुवारी शेअर बाजाराला बसला. सकाळपासूनच विक्रीचा सपाटा सुरू झाल्याने सेन्सेक्स १,२३६ अंकांनी कोसळला, तर निफ्टीनेही २५,४५० च्या खालची पातळी गाठली आहे. बाजार कोसळल्यामुळे एका दिवसात गुंतवणूकदारांचे ६.७९ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दिवसभरात सेन्सेक्स १,४७० अंकांपर्यंत घसरला होता. अखेर तो ८२,४९८.१४ अंकावर बंद झाला. तर निफ्टी ३६५ अंकांनी घसरून २५,४५४.३५ अंकांवर स्थिरावला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
इंडेक्स घसरण
निफ्टी ऑटो -२.१०%
निफ्टी मिडकॅप सि. -२.०९%
निफ्टी एफएमसीजी -१.७६%
सेन्सेक्स -१.४८%
निफ्टी ५० -१.४१%
निफ्टी बँक -१.३२%
बीएसई बँकेक्स -१.२७%
निफ्टी आयटी -१.०७%
रिअल्टी (घरबांधणी), वीज, ऑटो (गाड्या) आणि सिमेंट क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स २ ते २.५ टक्क्यांनी घसरले आहेत.
का कोसळला बाजार?
अमेरिका आणि इराणमध्ये विकोपाला गेलेला वाद. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती. परदेशी गुंतवणूकदारांकडून कमी खरेदी. अमेरिकन फेडरल बँकेच्या व्याजदर कपातीबाबत अनिश्चितता. भारतीय रुपयातील घसरण.
जागतिक पातळीवरील तणाव आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वळलेला भांडवली ओघ यामुळे गुरुवारी सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली. दिल्लीत चांदीच्या दरात १८ हजार रुपयांची वाढ होत, ते २.६४ लाख रुपये प्रति किलो तर सोने १,९५० रुपयांनी वाढून १,५८,६५० रुपयांवर पोहोचले आहे. चांदीच्या किमती ७ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
Web Summary : Escalating tensions between the US and Iran triggered a massive stock market crash. Sensex plummeted 1,236 points, with investors losing ₹6.79 lakh crore. Global tensions, rising gold prices, and uncertainty over US interest rates fueled the downturn across sectors.
Web Summary : अमेरिका और ईरान के बीच बढ़ते तनाव से शेयर बाजार में भारी गिरावट आई। सेंसेक्स 1,236 अंक गिरा, जिससे निवेशकों को ₹6.79 लाख करोड़ का नुकसान हुआ। वैश्विक तनाव, सोने की बढ़ती कीमतें और अमेरिकी ब्याज दरों पर अनिश्चितता के कारण गिरावट आई।