Join us

शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 10:27 IST

Share Market Updates: आज शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात जुलै महिन्याची सीरिजची सुरू होत आहे. या निमित्तानं बाजार किंचित वाढीसह उघडला.

Share Market Updates: आज शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात जुलै महिन्याची सीरिजची सुरू होत आहे. या निमित्तानं बाजार किंचित वाढीसह उघडला. शेअर बाजारात तेजी येण्याचा हा सलग चौथा दिवस आहे. सेन्सेक्स १९ अंकांनी वाढून ८३,७७४ वर उघडला. त्यानंतर तो १६० अंकांपेक्षा जास्त वाढला. निफ्टी २७ अंकांनी वाढून २५,५७६ वर उघडला, येथून तो ६० अंकांनी वाधारला. बँक निफ्टी २८ अंकांनी वाढून ५७,२३४ वर उघडला. चलन बाजारात डॉलरच्या कमकुवतपणाचा फायदा घेत रुपया मजबूत झाला. रुपया २० पैशांनी मजबूत होऊन ८५.५१/ डॉलर्सवर उघडला.

मिडकॅप-स्मॉलकॅप निर्देशांकात वाढ दिसून येत होती. कामकाजादरम्यान टाटा मोटर्स, रिलायन्स, एचसीएल टेक, टाटा स्टील सारखे शेअर्स आज वाढले. तर निफ्टीवरील एलटी, एसबीआय, टाटा स्टील, जिओ फिन, अपोलो हॉस्पिटल सारख्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. बजाज फिनसर्व्ह, एसबीआय लाईफ, बजाज फायनान्स, कोटक बँक, इटर्नल, श्रीराम फायनान्समध्ये घसरण झाली.

ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम

सकाळी, GIFT निफ्टी १०० अंकांनी वाढून २५७०० च्या वर होता. डाउ फ्युचर्समध्ये ५० अंकांची तेजी दिसून आली. निक्केईनं ६०० अंकांनी उसळी घेतली होती. काल, टॅरिफ डेडलाइन वाढवण्याच्या अपेक्षेनं अमेरिकन बाजारांनी तेजी दाखवली होती. डाउ ४०० अंकांनी वाढून ४ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला तर नॅस्डॅक २०० अंकांच्या नेत्रदीपक वाढीसह आयुष्यमान उच्चांकापासून काही अंकांनी दूर होता. S&P ५०० त्याच्या विक्रमी उच्चांकाच्या अगदी जवळ बंद झाला.

टॅग्स :शेअर बाजार