शेअर बाजारातील नवरत्न कंपनी 'रेल विकास निगम लिमिटेड'च्या (RVNL) चा शेअर बुधवारी बीएसईवर (BSE) जबरदस्त तेजीत दिसला. हा शेअर ३०९.७५ रुपयांवर बंद झाला. बाजार बंद होण्यापूर्वी कंपनीने नॉर्दर्न रेल्वेकडून मोठे कंत्राट मिळाल्याची माहिती दिली. कंपनीला नॉर्दर्न रेल्वेकडून तब्बल १,२०१ कोटी रुपयांचे लेटर ऑफ एक्सेप्टन्स (LoA) प्राप्त झाले आहे. गेल्या सहा वर्षांत या नवरत्न कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल १२१२ टक्क्यांहून अधिकचा बंपर परतावा दिला आहे.
हे महत्त्वपूर्ण कंत्राट ४८ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करायचे आहे. यामध्ये नवीन रेल-कम-रोड ब्रिज क्रमांक ११ च्या डिझाइन आणि बांधकाम, रेल्वे विकास निगम लिमिटेडला काशी रेल्वे स्थानकाजवळील विद्यमान मालवीय पुलाच्या ५० मीटर डाऊनसट्रीम आणि लखनौ विभागातील जनरल इलेक्ट्रिक वर्कच्या कामांसह, इतरही काही कामांचा समावेश आहे.
शेअर बाजारातील कामगिरीआरव्हीएनएलच्या शेअरमध्ये गेल्या काही वर्षांत जबरदस्त तेजी दिसून आली. २० फेब्रुवारी २०२० रोजी या शेअरची किंमत केवळ २३.६० रुपये होती, जी १८ फेब्रुवारी २०२६ रोजी ३०९.७५ रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या ५ वर्षांत या शेअरमध्ये ९१२ टक्के, तर गेल्या तीन वर्षांत ३५३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांतील वाढ २३ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिली आहे.
सध्या कंपनीचा शेअर आपल्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीचा विचार करता, ३० टक्क्यांनी खाली आहे. २० मे २०२५ रोजी शेअरने ४४८ रुपयांचा उच्चांक गाठला होता. शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २९५.२५ रुपये आहे. सप्टेंबर २०२५ च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, कंपनीमध्ये सार्वजनिक भागधारकांचा हिस्सा २७.१६ टक्के एवढा आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
Web Summary : RVNL shares surged after securing a ₹1201 crore railway contract. Investors enjoyed a massive 1212% return over six years. Share is 30% down from 52 week high.
Web Summary : RVNL को ₹1201 करोड़ का रेलवे ठेका मिलने के बाद शेयरों में उछाल आया। निवेशकों को छह वर्षों में 1212% का भारी रिटर्न मिला। शेयर अपने 52 सप्ताह के उच्च स्तर से 30% नीचे है।