Join us

Alok Industries Share : ₹28 चा शेअर खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड, सातत्याने देतोय परतावा; मुकेश अंबानींची मोठी भागीदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 13:45 IST

Alok Industries Share : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचीही या कंपनीत मोठी भागीदारी आहे.

वस्त्रोद्योग क्षेत्रातील कंपनी आलोक इंडस्ट्रीजचे शेअर्स सध्या फोकसमध्ये आहेत. गुरुवारी कंपनीचा शेअर 3% हून अधिकने वधारला आणि 28.86 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. यापूर्वी गेल्या बुधवारी या शेअरमध्ये 15% पर्यंत वाढ दिसून आली होती. गेल्या पाच दिवसांत हा शेअर 20% हून अधिक वधारला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचीही या कंपनीत मोठी भागीदारी आहे.

शेयरची कीमत -आज व्यवहारादरम्यान आलोक इंडस्ट्रीजचा शेअर 28.86 रुपयांच्या इंट्राडेवर पोहोचला. आज या शेअरचा इंट्राडे लो 27.88 रुपये होता. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 39.24 रुपये आहे. शेअरचा हा भाव जानेवारी 2024 मध्ये होता.

31 जुलै 2023 रोजी या शेअरची किंमत 14.56 रुपये होती. हा शेअरच्या 52 आठवड्यांचा निचांक आहे. या शेअर एका महिन्यात 10 टक्क्यांचा पॉझिटिव्ह परतावा दिला आहे. एका वर्षाचा विचार करता या शेअरने 65 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

शेयरहोल्डिंग पॅटर्न -आलोक इंडस्ट्रीजमधील शेअरहोल्डिंग पॅटर्नचा विचार करता, 75 टक्के एवढा वाटा प्रमोटर्सचा आहे. कंपनीच्या प्रमोटर्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज देखील आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडे एकूण 1,98,65,33,333 शेअर अथवा 40.01 टक्का एवढा वाटा आहे. तसेच, जेएम फायनान्शिअल अॅसेट रिकंस्ट्रक्शन आहे. हिच्याकडे 1,73,73,11,844 शेअर अथवा 34.99 टक्के वाटा आहे. या दोन कंपन्यांकडे संयुक्तपणे आलोक इंडस्ट्रीजचे स्वामित्व आहे. 

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

टॅग्स :मुकेश अंबानीशेअर बाजारशेअर बाजार