Join us

अदानी पोर्ट्स, टायटन, झोमॅटो पुन्हा कोसळले; मुकेश अंबानीच्या 'या' शेअर्सची घसरणीतही कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 16:19 IST

Stock Market Crash : बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली. मात्र, ती फार काळ चालू राहू शकली नाही. दुपारी बाराच्या सुमारास सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळले. सेन्सेक्स ६७४ अंकांहून अधिक कोसळला.

Stock Market Crash: बुधवारच्या व्यवहारात शेअर बाजार लाल रंगात बंद झाले. मात्र, शेवटच्या अर्ध्या तासात बाजारात स्थिरता आली आणि बाजार त्यांच्या खालच्या पातळीवरून बरेच नुकसान भरून काढण्यात यशस्वी ठरले. शेवटच्या अर्ध्या तासात, इन्फोसिस आणि टाटा मोटर्समधील खरेदी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि एचसीएल टेकमधील मजबूतीमुळे बाजाराला तोटा सावरण्यास मदत झाली. सुरुवातीच्या घसरणीनंतर, इन्फोसिस आणि टाटा मोटर्स व्यवहाराच्या शेवटी हिरव्या रंगात बंद करण्यात यशस्वी झाले.

तर RIL आणि TCS जवळपास २ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले आहेत. बाजारात बँकिंग शेअर्सवर आज दबाव होता. आज सेन्सेक्स ५१ अंकांच्या घसरणीसह ७८१४८ वर तर निफ्टी १९ अंकांच्या घसरणीसह २३६८९ वर बंद झाला. बुधवारी बँक निफ्टी ०.७३ टक्क्यांच्या घसरणीसह ४९८३५ स्तरावर बंद झाला.

बाजार उघडल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा ३० समभागांचा सेन्सेक्स ६०० हून अधिक अंकांनी घसरला होता, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १७० अंकांनी घसरला होता. बाजारातील या घसरणीदरम्यान, अदानी पोर्ट्स, टायटन, झोमॅटो या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. मात्र, मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स रॉकेट झाले.

या शेअर्समध्ये चढउतारनिफ्टीवर, ओएनजीसी, आयटीसी, एशियन पेंट, डॉ रेड्डी, टीसीएसमध्ये वाढ झाली. याशिवाय अपोलो हॉस्पिटल, ट्रेंट, अल्ट्राटेक सिमेंट, श्रीराम फायनान्स, बजाज ऑटो यांचे शेअर्स घसरले आहेत. सकाळची सुरुवात चांगली झाली नाही. सेन्सेक्स-निफ्टी लाल आणि हिरव्या चिन्हांमध्ये अगदी किरकोळ बदलांसह स्विंग करताना दिसले. मात्र यानंतर बाजारात मोठ्या घसरणीसह व्यवहार सुरू झाले. सेन्सेक्स ५८० अंकांनी घसरला आणि ७८,६०० च्या पातळीवर पोहोचला. निफ्टी १७० अंकांच्या घसरणीसह २३,५०० च्या आसपास व्यवहार करताना दिसला. बँक निफ्टी ७९० अंकांच्या मोठ्या घसरणीसह ४९,४०० च्या पातळीवर होता. मिडकॅप १०० निर्देशांक ११०० अंकांनी तर स्मॉलकॅप निर्देशांकही ४०० अंकांनी घसरला होता.

बाजारात रिकव्हरीनिफ्टी मिडकॅप १०० ने ६०० पेक्षा जास्त पॉइंट्स किंवा दिवसाच्या नीचांकी पातळीपासून सुमारे एक टक्के रिकव्हरी केली. त्याचवेळी निफ्टी बँकेतही सुमारे एक टक्का रिकव्हरी दिसून आली आहे. निर्देशांक ४५० हून अधिक अंकांनी सावरला आहे. तर सेन्सेक्स ६६२ अंकांच्या रिकव्हरीसह आणि निफ्टी १९३ अंकांच्या खालच्या पातळीवरून बंद झाला आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांकनिफ्टी