Share Market Opening 8 August, 2025: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के कर आकारणीच्या नकारात्मक परिणामासह आज भारतीय शेअर बाजारानं पुन्हा एकदा व्यवहाराला सुरुवात केली. आज सलग चौथ्या दिवशी देशांतर्गत बाजार घसरणीसह रेड झोनमध्ये उघडले. शुक्रवारी, बीएसई सेन्सेक्स १४५.२५ अंकांच्या (०.१८%) घसरणीसह ८०,४७८.०१ अंकांवर उघडला. त्याचप्रमाणे, एनएसई निफ्टी ५० निर्देशांकानेही ५१.९० अंकांच्या (०.२१%) घसरणीसह २४,५४४.२५ अंकांवर व्यवहार सुरू केला. गुरुवारी, सेन्सेक्स २८१.०१ अंकांच्या (०.३५%) घसरणीसह ८०,२६२.९८ अंकांवर आणि निफ्टी ५० निर्देशांक ११०.०० अंकांच्या (०.४५%) घसरणीसह २४,४६४.२० अंकांवर उघडला होता.
भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये सुरुवातीची मोठी घसरण
शुक्रवारी, सेन्सेक्सच्या ३० पैकी १६ कंपन्या वाढीसह ग्रीन झोनमध्ये उघडल्या आणि उर्वरित १२ कंपन्या घसरणीसह रेड झोनमध्ये उघडल्या, तर अल्ट्राटेक सिमेंट आणि एनटीपीसीचे शेअर्स आज कोणताही बदल न होता उघडले. दुसरीकडे, आज निफ्टी ५० मधील ५० पैकी २७ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह ग्रीन झोनमध्ये उघडले आणि उर्वरित २३ कंपन्यांचे शेअर्स तोट्यासह रेड झोनमध्ये उघडले. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, टेक महिंद्राचे शेअर्स आज सर्वाधिक ०.६१ टक्के वाढीसह उघडले आणि भारती एअरटेलचे शेअर्स आज सर्वाधिक २.७७ टक्के घसरणीसह उघडले.
कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
सेन्सेक्सच्या उर्वरित कंपन्यांची सुरुवात कशी झाली?
या व्यतिरिक्त, सेन्सेक्समधील उर्वरित कंपन्यांमध्ये, ट्रेंटचे शेअर्स ०.५६ टक्के, टाटा मोटर्स ०.५६, टीसीएस ०.३६, बजाज फायनान्स ०.३६, हिंदुस्तान युनिलिव्हर ०.३२, आयटीसी ०.३१, बजाज फिनसर्व्ह ०.३१, एल अँड टी ०.२७, मारुती सुझुकी ०.२५, आयसीआयसीआय बँक ०.२३, कोटक महिंद्रा बँक ०.२०, एशियन पेंट्स ०.१४, टायटन ०.१२, एसबीआय ०.०८ आणि सन फार्माचे शेअर्स शुक्रवारी ०.०२ टक्क्यांनी वधारले.
दुसरीकडे, आज इटर्नलचे शेअर्स ०.६६, पॉवरग्रिड ०.५८, बीईएल ०.४५, इन्फोसिस ०.४३, अदानी पोर्ट्स ०.३९, महिंद्रा अँड महिंद्रा ०.३०, एचडीएफसी बँक ०.२८, टाटा स्टील ०.१६, रिलायन्स इंडस्ट्रीज ०.१५, एचसीएल टेक ०.१३ आणि अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये ०.१२ टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार सुरू झाला.