Join us  

शेअर बाजार, क्रिप्टो, सोन्या-चांदीने गुंतवणूकदारांना केले ‘गरीब’! ३०० कंपन्या नीचांकी स्तरावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 9:15 AM

सतत वाढत असलेल्या महागाईने आणि युक्रेन संकटामुळे निर्माण झालेल्या राजकीय तणावामुळे आतापर्यंत २०२२ गुंतवणूकदारांसाठी अतिशय निराशाजनक ठरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सतत वाढत असलेल्या महागाईने आणि युक्रेन संकटामुळे निर्माण झालेल्या राजकीय तणावामुळे आतापर्यंत २०२२ गुंतवणूकदारांसाठी अतिशय निराशाजनक ठरले आहे. अस्थिरता आणि पैसे बुडण्याच्या भीतीने कोणत्याही मालमत्तेतून या वर्षी नफा मिळालेला नाही.

शेअर बाजारापासून ते किप्टोकरन्सी आणि सोने-चांदीपासून ते धातूमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना २०२२ मध्ये तोटा झाला आहे. युक्रेन संकटामुळे चमकलेल्या सोन्याचे दरही घसरल्याने केवळ ०.३ टक्के परतावा मिळाला तर चांदीने -१०.२ टक्के परतावा दिला आहे. क्रिप्टोकरन्सी बाजार या वर्षी ४० टक्क्यांपर्यंत खाली कोसळला आहे. बिटकॉईनमध्ये ३७ टक्के तर इथेरियममध्ये ४६ टक्के घसरण झाली आहे. निर्देशांक २०२२ मध्ये १०.८० टक्के आणि निफ्टी १०.४५ टक्क्यांनी घसरले आहेत. बीएसईचा मिडकॅप इंडेक्स १३.५८ टक्के आणि स्मॉलकॅप इंडेक्स १५.०७ टक्क्यांनी घसरले आहेत. हीच स्थिती जगभरातील शेअर बाजारांची आहे.

- २२.४० लाख कोटी रुपयांनी कंपन्यांचे बाजार भांडवल घटले.

- ४०% कोसळला क्रिप्टोकरन्सी बाजार.

- ३०० पेक्षा अधिक भारतीय कंपन्यांचे समभाग आपल्या एक वर्षाच्या नीचांकी स्तरावर मे महिन्यात पोहोचले

केवळ सौदीचा बाजार वाढला

- सौदी अरेबियाचा बाजार सोडून जगातील सर्व प्रमुख शेअर बाजारांमध्ये घसरण आली आहे. 

- यामुळे जगभरातील नोंदणीकृत कंपन्यांचे बाजार भांडवल १९ टक्क्यांपेक्षा अधिक घसरून ९९.१ ट्रिलीयन डॉलरवर आले आहे. 

- नोव्हेंबरमध्ये कंपन्यांचे भांडवल १२२.५ ट्रिलीयन डॉलर होते.

जगभरात प्रमुख शेअर बाजार

देश    बाजार        बाजारातील    भांडवल         घसरणअमेरिका    ४२.४३        -२१.०८चीन     ९.७९         -२५.११जपान     ५.३९         -१८.५८हाँगकाँग     ५.१२         -१५.६८सौदी अरेबिया ३.३३         २४.९७ ब्रिटन     ३.०४         -१७.३१भारत     ३.०३         -१२.४२कॅनडा     २.८७         -१०.२३फ्रान्स     २.६६         -२३.३४जर्मनी     २.०८         -२७.७६(बाजार भांडवल लाख कोटी डॉलरमध्ये, घसरण टक्क्यांमध्ये)

टॅग्स :शेअर बाजारसोनंचांदीक्रिप्टोकरन्सीगुंतवणूक