Join us

अर्थसंकल्पानंतर सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये तेजी! सेन्सेक्स-निफ्टी घसरणीने झाला बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 16:58 IST

आज केंद्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्प मांडला.या  अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअरमध्ये वाढ झाली आहे.

आज केंद्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्प मांडला.या  अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअरमध्ये वाढ झाली आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात कर्ज घेण्याच्या कार्यक्रमासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली. यानंतर पीएसयु बँकांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. अर्थसंकल्पानंतर निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक ३ टक्क्यांहून अधिक वाढला. नफ्यासह शेअर्स ट्रेडिंगमध्ये इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि बँक ऑफ बडोदा आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या समभागांचा समावेश आहे.

आज शेअर मार्केट बंद होताना बीएसई सेन्सेक्सने १०७ अंकांची कमजोरी नोंदवली आणि ७१६४५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

संरक्षणावर पूर्ण भर; कृषी, शेतकरी कल्याणला सर्वात कमी बजेट! अर्थसंकल्पातून कुणाला काय मिळालं?

तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २८ अंकांनी घसरून २१६९७ अंकांच्या पातळीवर बंद झाला आहे. गुरुवारच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप १००, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी आयटी निर्देशांकात कमजोरी नोंदवली, तर निफ्टी बँक निर्देशांक किंचित वाढीवर बंद करण्यात यशस्वी झाला.

शेअर बाजारातील आघाडीच्या शेअर्समध्ये मारुती सुझुकी, पॉवर ग्रिड, सिप्ला आणि एसबीआय लाइफचे शेअर्स होते, तर नुकसान झालेल्यांमध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट आणि डॉ. रेड्डीजचे शेअर्स होते.

टाटा समूहाची दिग्गज कंपनी टायटनचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल आले आहेत. वर्ष-दर-वर्ष आधारावर, डिसेंबर तिमाहीत टायटनचा निव्वळ नफा ९ टक्क्यांनी वाढून १०४० कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे.

आज आयशर मोटर्स, एचडीएफसी लाइफ आणि ॲक्सिस बँक सारख्या कंपन्यांच्या समभागांचा समावेश होता. जेएसडब्ल्यू स्टील, टायटन आणि ओएनजीसी सारख्या समभागांचाही कमकुवत समभागांच्या यादीत समावेश होता.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार