Join us

शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; ट्रेंट, बजाज फायनान्स, हिरोसह 'या' स्टॉक्समध्ये सर्वाधिक वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 16:01 IST

stock market closed : बुधवारी निफ्टी पॅक शेअर्समध्ये ट्रेंट, बजाज फायनान्स, ब्रिटानिया, श्रीराम फायनान्स आणि हिरो मोटोकॉर्पमध्ये सर्वात जास्त वाढ नोंदवली गेली.

stock market closed : भारतीय शेअर बाजार आज बुधवारी सपाट बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज ०.०२ टक्के किंवा १६ अंकांच्या वाढीसह ८१,५२६ वर बंद झाला. बाजार बंद होताना, सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी १८ शेअर्स लाल रंगात आणि १२ शेअर्स हिरव्या रंगात होते. त्याचवेळी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही बुधवारी वाढीसह बंद झाला. तो ०.११ टक्के किंवा २६ अंकांच्या वाढीसह २४,६३६ वर बंद झाला. बाजार बंद होताना, निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी २६ शेअर्स हिरव्या रंगात तर २३ शेअर्स लाल रंगात आणि १ शेअर्स कोणत्याही बदलाशिवाय व्यवहार करत होते.

निफ्टी शेअर्सची स्थितीबुधवारी निफ्टी पॅक शेअर्समध्ये ट्रेंट, बजाज फायनान्स, ब्रिटानिया, श्रीराम फायनान्स आणि हिरो मोटोकॉर्पमध्ये सर्वात जास्त वाढ नोंदवली गेली. तर, जेएसडब्ल्यू स्टील, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, ॲक्सिस बँक आणि एसबीआयमध्ये सर्वाधिक घसरण नोंदवली गेली.

सेक्टोरल निर्देशांकांची स्थितीक्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे झाल्यास, आज निफ्टी ऑटो ०.३६ टक्के, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस ०.१८ टक्के, निफ्टी एफएमसीजी ०.४२ टक्के, निफ्टी आयटी ०.३३ टक्के, निफ्टी मेटल ०.०९ टक्के, निफ्टी फार्मा ०.०५ टक्के, निफ्टी १८ टक्के, निफ्टी हेल्थकेअर इंडेक्स ०.३७ टक्के, निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स ०.५७ टक्के, निफ्टी ऑइल अँड गॅस ०.०२ टक्के आणि निफ्टी मिडस्मॉल हेल्थकेअर ०.१४ टक्क्यांनी वधारले. याशिवाय निफ्टी प्रायव्हेट बँकेत ०.२५ टक्के, निफ्टी पीएसयू बँकेत ०.८९ टक्के, निफ्टी मीडिया ०.५१ टक्क्यांनी तर निफ्टी बँक ०.३५ टक्क्यांनी घसरला.

आशियाई बाजारात काय स्थिती?आशियाई बाजारात दक्षिण कोरियाचा कोस्पी, हाँगकाँगचा हँग सेंग आणि चीनचा शांघाय कंपोझिट नफ्यात होता, तर जपानचा निक्केई तोट्यात होता. मंगळवारी अमेरिकी बाजार नकारात्मक ट्रेंडसह बंद झाले. आंतरराष्ट्रीय मानक ब्रेंट क्रूड ०.५४ टक्क्यांच्या वाढीसह प्रति बॅरल ७२.५८ डॉलर वर राहिला. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) मंगळवारी खरेदीदार होते. त्यांनी निव्वळ १,२८५.९६ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकबजाज ऑटोमोबाइल