Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर ६०% हूनही अधिक घसरला, ३० रुपयांपेक्षाही खाली आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 18:04 IST

गेल्या सहा महिन्यांत रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये ५३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. ११ जून २०२५ रोजी हा शेअर ७६.४९ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर होता.

अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवरचा शेअर ₹३० च्याही खाली आला आहे. बुधवारी बीएसईवर रिलायन्स पॉवरचा शेअर ₹२९.३८ वर आला होता, जो ५२ आठवड्यांचा नीचांक ठरला. हा शेअर ₹२९.६२ वर बंद झाला. 

गेल्या सहा महिन्यांत रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये ५३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. ११ जून २०२५ रोजी हा शेअर ७६.४९ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर होता. यानंतर आतापर्यंत या शेअरमध्ये ६० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. केवळ गेल्या महिनाभरातच गुंतवणूकदारांचे १६ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे.

दीर्घकालीन कामगिरी आणि बोनस शेअर अल्पकालीन घसरण सुरू असली, तरी दीर्घकालीन गुंतवणुकीत या शेअरने चांगली कामगिरी केल्याचे दिसते. गेल्या पाच वर्षांत रिलायन्स पॉवरचा शेअर ३.४० रुपयांवरून (२२ जानेवारी २०२१) २९.६२ रुपयांपर्यंत पोहोचला असून, या काळात गुंतवणूकदारांना तब्बल ७७० टक्के परतावा मिळाला आहे. तसेच कंपनीने आपल्या भागधारकांना ५ शेअर्सवर ३ बोनस शेअर्स (३:५ प्रमाण) देऊन खूश केले होते.

महत्वाचे म्हणजे, गेल्या वर्षभरात या शेअरने २६ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

 

English
हिंदी सारांश
Web Title : Anil Ambani's Reliance Power Share Plunges Over 60%

Web Summary : Reliance Power share hits a 52-week low, dropping below ₹30. While recent performance is poor, long-term investors saw 770% returns in five years. Experts advise caution before investing.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकस्टॉक मार्केट