Join us

मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 19:02 IST

अमेरिकन ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट (Scott Bessent) यांच्या सकारात्मक प्रतिक्रियेमुळे, आज या टेक्सटाइलशी संबंधित कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून आली...

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अलोक इंडस्ट्रीज कंपनीचा शेयर खरेदी करण्यासाठी आज लोकांची झुंबड उडाली होती. अलोक इंडस्ट्रीजचा शेअर जवळपास १०% पर्यंत वधारला आणि टॉप गेनर्समध्येही सामील झाला. हा शेअर आज जवळपास ₹१९ रुपयांच्या इंट्रा डे हायवर पोहोचला होता.

अमेरिकन ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट (Scott Bessent) यांच्या सकारात्मक प्रतिक्रियेमुळे, आज या टेक्सटाइलशी संबंधित कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून आली. भारत आणि अमेरिका आपसातील व्यापाराशी संबंधित तणावावर लवकरच मार्ग काढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

जून तिमाहीचे निकाल -जून २०२५ ला संपलेल्या तिमाहीत आलोक इंडस्ट्रीजचा शुद्ध घाटा १७१.५६ कोटी रुपये एवढा होता. तर जून २०२४ ला  संपलेल्या तिमाहीत तो २०६.८७ कोटी रुपये एवढा होता. जून २०२५ ला संपलेल्या तिमाहीतील विक्री ७.३३% ने कमी होऊन ९३२.४९ कोटी रुपयांवर आली, तर जून २०२४ ला संपलेल्या गत तिमाहीत १००६.३० कोटी रुपये होती.

१९८६ मध्ये स्थापन झालेली आलोक इंडस्ट्रीज, ही एक एकात्मिक कापड उत्पादक कंपनी आहे. जिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. ही कंपनी कापूस आणि पॉलिस्टर या दोन्ही क्षेत्रात काम करते. कापूस क्षेत्रात, कंपनी कताईपासून विणकाम, प्रक्रिया, तयार कापड, चादरी, टॉवेल आणि कपडे अशा सर्व क्षेत्रात काम करते. मार्च तिमाहीच्या अखेरीस, आरआयएलकडे कंपनीचा ४०% हिस्सा होता, तर जेएम फायनान्शियल एआरसीकडे कंपनीचा ३४.९९% हिस्सा होता.

टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटमुकेश अंबानी