Join us
Daily Top 2Weekly Top 5

२ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 15:46 IST

​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: कोटक महिंद्रा बँकेने शुक्रवारी आपल्या स्थापनेची ४० वर्षे पूर्ण केली. जाणून घेऊया कोटक महिंद्रा बँकेचा आजवरचा प्रवास करा होता.

Kotak Mahindra Bank Success Story: कोटक महिंद्रा बँकेने शुक्रवारी आपल्या स्थापनेची ४० वर्षे पूर्ण केली. या खास दिवशी, संस्थापक उदय कोटक यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. मुंबईतील एका छोट्या कार्यालयातून त्यांनी सुरुवात केली होती आणि केवळ काही लाख रुपयांतून त्यांच्या कोटक महिंद्रा बँक प्रवासाला सुरुवात झाल्याचं त्यांनी सांगितलं.

आज ही बँक भारतातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक बनली आहे. एका लहानशा ठिकाणाहून इतकी मोठी संस्था उभी करणं हे खरोखरच स्वप्नवत वाटत असल्याचं उदय कोटक यांनी जुने फोटो शेअर करताना म्हटलं.

सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार

३०० स्क्वेअर फुटाच्या ऑफिसमधून झाली सुरुवात

उदय कोटक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर एका पोस्टद्वारे आठवण करून दिली की, त्यांचा हा व्यवसाय एका लहानशा रकमेतून आणि लहानशा जागेतून कसा सुरू झाला. “आजपासून ४० वर्षांपूर्वी, मी मुंबईच्या फोर्ट भागात ३०० स्क्वेअर फुटाच्या ऑफिसमध्ये ₹ ३० लाखांच्या कॅपिटलसह एक कंपनी सुरू केली होती. आज ती कंपनी, जी मी ३८ वर्षांपर्यंत चालवली, ती कोटक महिंद्रा बँक आहे.भारतीय संस्था बदलत्या वेळेनुसार पुढे जात आहेत. आशा आहे की ती आणखी प्रगती करेल. वाढदिवसाच्या शुभेच्छा..,” असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं.

आनंद महिंद्रांकडून शुभेच्छा

उदय कोटक यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केवळ संदेशच नव्हे, तर जुन्या आठवणींचे अनेक फोटोही शेअर केले. त्यातील एका कोलाजमध्ये मागील वर्षांचे खास क्षण कैद आहेत. एका फोटोत उदय कोटक आनंद महिंद्रा आणि दिवंगत स्टार विनोद खन्ना यांच्यासोबत हसताना दिसत आहेत. या पोस्टमध्ये पूर्णपणे उत्साहाचं वातावरण दिसून आले. लोकांनी या पोस्टवर कमेंट्स करून त्यांना शुभेच्छाही दिल्या.

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आणि टीम सदस्य आनंद महिंद्रा यांनी देखील उदय कोटक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या ४० वर्षांच्या प्रवासाचे कौतुक केले. त्यांनीही 'एक्स'वर बँकेचा हा प्रवास खास असल्याचे सांगितलं. त्यांनी लिहिले, “उदय, तुमचा प्रवास खरोखरच एक कथा आहे. कोटक बँक लिमिटेडच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त खूप-खूप अभिनंदन. ४० वर्षांपासून, एक मित्र, विश्वासू आणि प्रशंसक म्हणून तुम्हाला प्रोत्साहन देणं, हे माझ्यासाठी सर्वात मोठं भाग्य राहिलं आहे. आणि तुम्ही पुढे जाल तेव्हा मी तुमच्या आणि तुमच्या टीमसाठी अधिक प्रोत्साहन देत राहीन. माझ्या संग्रहातून काढलेली ही एक खास आठवण आहे…”

निवडला वेगळा मार्ग

उदय कोटक यांना लहानपणी एक क्रिकेटर व्हायचं होतं, पण दुखापत झाल्यामुळे ते स्वप्न अपूर्ण राहिलं. त्यांचं कुटुंब कापसाचा व्यवसाय करत होतं, पण उदय यांना तो आवडला नाही. त्यांनी कौटुंबिक व्यवसाय सोडून वेगळा मार्ग निवडला आणि १९८५ मध्ये केवळ एका लहानशा इनव्हेस्टमेंट कंपनीची (Investment Company) सुरुवात केली, जिनं नंतर कोटक महिंद्रा बँकेचं रूप घेतलं.

याच सुरुवातीच्या काळात उदय कोटक यांची भेट आनंद महिंद्रा यांच्याशी झाली. आनंद महिंद्रा त्यावेळी हार्वर्डमधून शिकून परतले होते आणि महिंद्रा समूहाच्या स्टील कंपनीत काम करत होते. उदय कोटक यांनी त्यांना एक उत्कृष्ट कल्पना सांगितली की, पुरवठादारांना कमी व्याजदरावर झटपट पेमेंट करू शकतो. हे ऐकून आनंद महिंद्रा यांनाही तो चांगला प्लान वाटला. त्यानंतर, आनंद महिंद्रा यांनी उदय कोटक यांच्या नवीन कंपनीत पैसे गुंतवण्याचा निर्णय घेतला आणि या दोघांच्या मैत्रीसोबत कोटकचा प्रवास अधिक वेगानं सुरू झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Kotak Mahindra Bank: Humble beginnings to 4 lakh crore turnover.

Web Summary : Kotak Mahindra Bank celebrates 40 years, recalling its start from a small Mumbai office with minimal capital. Uday Kotak shared memories, highlighting the bank's growth into a leading private institution, fueled by innovation and key partnerships like with Anand Mahindra.
टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीव्यवसायबँक