Investment Strategy : शेअर बाजार म्हणजे 'कुबेराचा खजिना' आहे असे मानून अनेक जण येथे नशीब आजमावायला येतात. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश किरकोळ गुंतवणूकदार आपले कष्टाचे पैसे गमावून बसतात. याचे नेमके कारण काय? जगातील सर्वात यशस्वी हेज फंड मॅनेजरपैकी एक असलेल्या स्टॅनली ड्रकनमिलर यांनी यामागचे रहस्य उलगडले आहे. त्यांच्या मते, सामान्य माणसाच्या विनाशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याचे “आज”मध्ये जगणे.
१. 'आज'च्या बातम्यांवर विश्वास ठेवणे हीच मोठी चूकड्रकनमिलर यांच्या मते, जर तुम्ही केवळ आजचे तिमाही निकाल, आजच्या ब्रेकिंग न्यूज किंवा सध्याची परिस्थिती पाहून गुंतवणुकीचा निर्णय घेत असाल, तर तुम्ही मोठी चूक करत आहात. स्मार्ट गुंतवणूकदार नेहमी भविष्यातील अपेक्षांवर डाव लावतो. बाजार हा असा प्लॅटफॉर्म आहे जो भविष्यातील घटनांना 'डिस्काउंट' करतो. जेव्हा सामान्य माणूस आजच्या चांगल्या निकालांमुळे शेअर खरेदी करतो, तेव्हा स्मार्ट मनी (मोठे गुंतवणूकदार) आधीच नफा कमावून बाहेर पडण्याची तयारी करत असतात.
२. नैराश्यातच दडलेला असतो 'मल्टीबॅगर' जॅकपॉटड्रकनमिलर म्हणतात की, जेव्हा एखाद्या सेक्टरमध्ये चहूकडे मंदी असते, कंपन्या तोटा दाखवत असतात आणि कंपन्यांना टाळे लागतात, तेव्हा सामान्य गुंतवणूकदार घाबरून आपले पैसे काढून घेतो. जेव्हा एखाद्या उद्योगाबद्दल बाजारात कमालीची निराशा असते, तेव्हाच भविष्यातील 'मल्टीबॅगर' शेअर्सचा जन्म होतो. कमकुवत कंपन्या बाहेर पडल्यामुळे पुरवठा कमी होतो आणि मागणी वाढताच उरलेल्या कंपन्यांचा नफा रॉकेटसारखा वाढतो. दूरदृष्टी असलेला गुंतवणूकदार याच 'बदलावर' पैज लावतो.
३. बॉल कुठे जाणार, हे ओळखणे महत्त्वाचेआपली रणनीती स्पष्ट करण्यासाठी ड्रकनमिलर यांनी हॉकीचे उदाहरण दिले आहे. ते म्हणतात, “हॉकीचा महान खेळाडू तो नाही जो बॉल जिथे आहे तिथे उभा राहतो, तर तो आहे जो बॉल पुढच्या काही सेकंदात कोणत्या दिशेला जाणार आहे, याचा अंदाज घेतो.” शेअर बाजाराचा नियमही अगदी असाच आहे.
१८ ते २४ महिन्यांचा 'फ्यूचर व्हिजन' मंत्रड्रकनमिलर यांच्या मते, यशाचे एकमेव सूत्र म्हणजे स्वतःला हा प्रश्न विचारणे: “आजपासून १८ ते २४ महिन्यांनंतर जग कसे असेल?” जर तुम्ही पुढच्या दोन वर्षांचा आर्थिक आणि व्यावसायिक रोडमॅप तयार करू शकलात, तर तुम्ही अशा कंपन्या ओळखू शकाल ज्या आज मातीमोल वाटत असल्या तरी भविष्यात सोन्याच्या भावाने विकल्या जातील. जो आजची परिस्थिती पाहून डगमगला त्याचे पैसे बुडाले, पण ज्याने भविष्याचा वेध घेतला त्यानेच इतिहास रचला, असे ड्रकनमिलर आवर्जून सांगतात.
वाचा - आठवडाभरात चांदी ४,५०० रुपयांनी स्वस्त, पण सोन्यात मोठी वाढ! महाशिवरात्रीला खरेदी करावे की थांबावे?
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Stanley Druckenmiller advises investors to focus on future expectations, not current news. Multibagger stocks emerge during industry downturns. Predict future trends like a hockey player anticipating the puck's movement. Look 18-24 months ahead to identify undervalued companies.
Web Summary : स्टैनली ड्रकनमिलर निवेशकों को वर्तमान समाचारों के बजाय भविष्य की उम्मीदों पर ध्यान केंद्रित करने की सलाह देते हैं। मल्टीबैगर स्टॉक उद्योग में गिरावट के दौरान उभरते हैं। हॉकी खिलाड़ी की तरह भविष्य के रुझानों का अनुमान लगाएं। कम मूल्य वाली कंपनियों की पहचान करने के लिए 18-24 महीने आगे देखें।