Join us

९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 16:46 IST

Spright Agro Share: मंगळवारी बीएसईवर कंपनीच्या शेअरला ५% चं अपर सर्किट लागलं. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार बोनस इक्विटी शेअर्स जारी करण्यावर संचालक मंडळाच्या बैठकीत विचार केला जाईल.

Spright Agro Share: मंगळवारी बीएसईवर स्प्राईट अ‍ॅग्रोच्या शेअरला ५% चं अपर सर्किट लागलं. यासह, शेअर प्रति शेअर ₹१.३९ वर पोहोचला. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवार, १८ सप्टेंबर २०२५ रोजी होणार असल्याची घोषणा कंपनीनं केल्यानंतर शेअर्समध्ये ही वाढ झाली. बैठकीत कंपनी बोनस शेअर्स, लाभांश आणि कृषी तंत्रज्ञान व्यवसायात प्रवेश यासारख्या महत्त्वाच्या प्रस्तावांवर विचार करेल.

कंपनी १ वर १० बोनस शेअर्स देणार

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार बोनस इक्विटी शेअर्स जारी करण्यावर संचालक मंडळाच्या बैठकीत विचार केला जाईल. कंपनीनं १:१० च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करावेत, म्हणजेच प्रत्येक शेअरसाठी १० बोनस शेअर्स जारी करावेत असा प्रस्ताव आहे. हा इश्यू फ्री रिझर्व्ह आणि/किंवा सिक्युरिटीज प्रीमियमचे कॅपिटलायझेशन करून केला जाईल. दरम्यान, बोनस इश्यूसाठी शेअरहोल्डर आणि इतर आवश्यक मंजुरी देखील आवश्यक असतील. कंपनीनं अद्याप यासाठी रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही.

ईपीएफओ सदस्यसंख्येत दुपटीहून अधिक वाढ; रोजगारात बूस्टर

१००% लाभांश देखील जाहीर

या आर्थिक वर्षासाठी संचालक मंडळ इक्विटी शेअर भांडवलावर १००% पर्यंत लाभांश जाहीर करण्याचा किंवा शिफारस करण्याचा विचार करेल. हे देखील नियामक आणि शेअरहोल्डरच्या मान्यतेनंतरच शक्य होईल. लाभांशाची रेकॉर्ड तारीख अद्याप निश्चित केलेली नाही.

शेअर्सची स्थिती काय?

कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत अलिकडेच मोठी घसरण झाली आहे. गेल्या एका महिन्यात या शेअर्सच्या किमतीत २२% घट झाली आहे, तर तीन महिन्यांत ६५% घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे, सहा महिन्यांच्या कालावधीत या शेअर्समध्ये ७७% घट झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून (YTD आधारावर) या शेअर्समध्ये ९२% ची मोठी घसरण झाली आहे. तथापि, दीर्घ कालावधीत, या शेअर्सनं अजूनही मल्टीबॅगर परतावा दिला आहे, गेल्या तीन वर्षांत यानं तब्बल ३४५% परतावा दिला आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक