Join us  

... तर Google सर्चसाठी पैसे द्यावे लागणार?; कंपनीकडून पॉलिसीत होतोय बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 5:43 PM

गुगलने काही दिवसांपूर्वीच गुगल सर्चसह जनरेटीव्ह AI स्नॅपशॉट फिचर एक्सपेरिमेंटल फिचर लाँच केले होते.

इंटरनेट वापरणं ही आजच्या काळाची गरज बनली असून सोशल मीडिया हाही त्याचा अविभाज्य घटक झाला आहे. त्यामुळेच, दिवसेंदिवस नेटीझन्स आणि इंटरनेट युजर्संची संख्या वाढताना दिसत आहे. इंटरनेट युजर्संमध्ये सर्वाधिक लोकप्रिय सर्च इंजिन म्हणजे गुगल होय. गुगलने आत्तापर्यंत युजर्संना अनेक सेवा मोफतच दिल्या आहेत. त्यातूनही कंपनीला मोठा महसूल जमा होत आहे. मात्र, आता कंपनीने नवीन पॉलिसी लागू करण्याचा विचार सुरू केला आहे. त्यानुसार, कंपनीकडून प्रिमियम फिचर्सवर काम सुरू झाले आहे. AI जनरेटीव्ह संबंधित हे फिचर्स असून त्यासाठी युजर्संना पैसे द्यावे लागणार आहेत. 

गुगलने काही दिवसांपूर्वीच गुगल सर्चसह जनरेटीव्ह AI स्नॅपशॉट फिचर एक्सपेरिमेंटल फिचर लाँच केले होते. या फिचरच्या मदतीने युजर्संना सर्च केलेल्या टॉपिक संदर्भात AI सर्च रिझल्टपेक्षाही अधिक दाखवले जाते. AI सर्च केलेल्या एका टॉपिकची समरी युजर्संना दिसून येते. मात्र, आता कंपनीकडून याच बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फायनान्सियल टाइम्सने आपल्या वृत्तांकनात माहिती दिली. त्यानुसार, जर गुगलने असे बदलाव केल्यास गुगलकडून पहिल्यांदाच सर्ज इंजिनच्या वापरासाठी युजर्संकडून पैसे (चार्ज) घेतले जातील. 

ChatGpt ने बिघडवला खेळ

गुगल सर्चमधून कंपनीची मोठी कमाई होते. मात्र, ChatGpt आल्यानंतर कंपनीच्या बिझनेसवर परिणाम होत असल्याचे भीती व्यक्त होत आहे. चॅट जीपीटी प्लॅटफॉर्म लाँच होऊन दीड वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. आता, कंपनीकडून बिझनेस मॉडेलच्या अनुषंगाने मोठ्या बदलाचे संकेत दिले जात आहेत. त्यावरुन, कंपनी AI बाबत कशाप्रकारे विचार करते, हे यावरुन दिसून येते. 

मूळ सर्च इंजिन मोफतच राहणार

गुगलकडून त्या विचारांचा पर्याय शोधला जात आहे, ज्यामुळे AI फिचर्सला प्रिमियम सबस्क्रीप्शनसोबत जोडले जाऊ शकेल. कंपनीकडून Gemini AI असिस्टंट फीचर्स पहिल्यापासूनच जी-मेल आणि डॉक्ससह देत आहे. कंपनीतील यासंबंधित जोडलेल्या तीन जणांकडून ही माहिती देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, इंजिनिअर्स या टेक्नॉलॉलीवर काम करत आहेत. मात्र, कंपनी एक्झिक्युटीव्हकडून याबाबत अद्यापही अंतिम निर्णय घेण्यात आला नाही. दरम्यान, कंपनीचे ट्रॅडिशनल सर्च इंजिन पूर्वीप्रमाणेच फ्री असणार आहे. तर, कंपनी सबस्क्राईबर्संनाही जाहिरात दाखवण्याचा विचार कंपनीकडून सुरू आहे.  

टॅग्स :गुगलआर्टिफिशिअल इंटेलिजन्सइंटरनेट