Join us

देशभर सोन्याचा एकच दर, सराफ व्यावसायिक लवकरच निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 05:10 IST

gold price : दागिन्यांच्या क्षेत्रातील जाणकारांच्या मते, अनेक ज्वेलर्स हे कर भरत नाहीत आणि त्यामुळे ते कमी किमतीत दागिने विकतात. 

नवी दिल्ली : सोन्याचा भाव संपूर्ण देशभर एकसारखा असावा, अशी मागणी होत आहे. मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने देशात सगळ्या स्टोअर्समध्ये सोन्याचा एकच भाव ठेवला आहे. इतरही सराफ व्यावसायिकांनीही हाच मार्ग वापरण्याचे नियोजन केल्याचे समजते. सोन्याची सर्वांत जास्त आयात होते ती भारतात. या आयात सोन्याची देशभर किमतही जवळपास एकसारखीच असते. तरीही देशभरातील वेगवेगळ्या ज्वेलर्स असोसिएशनकडून अलंकार, दागिन्यांचे भाव वेगवेगळे निश्चित केले गेले आहेत.२९ ऑक्टोबर रोजी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची किंमत १० ग्रॅमसाठी ४९,१०० रुपये इतकी होती. केरळमध्ये ती ४६,८५० रुपये, मुंबईत ४९,६८० रुपये आणि चेन्नईत ४७,३८० रुपये होती.  दागिन्यांच्या क्षेत्रातील जाणकारांच्या मते, अनेक ज्वेलर्स हे कर भरत नाहीत आणि त्यामुळे ते कमी किमतीत दागिने विकतात. 

टॅग्स :सोनं