Join us  

Yes Bank : येस बँकेची एकच डील, शेअर्सनी घेतला रॉकेट स्पीड; फक्त 3 दिवसांत दिला बम्पर परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 2:08 PM

2022 मध्ये येस बँकेतील गुंतवणूक गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त ठरली होती. यादरम्यान बँकेने पोझिशनल गुंतवणूकदारांना 57.78 टक्क्यांपर्यंतचा परतावा देत मालामाल केले होते.

Yes Bank केच्या शेअर्समध्ये आज पुन्हा जबरदस्त तेजी दिसून आली. या प्रायव्हेट सेक्टर बँकेचे शेअर्स मंगळवारी जवळपास 3 टक्क्यांपर्यंत वधारले होते. मात्र यानंतर, बँकेच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. सकाळी 11.25 मिनिटाला बीएसईवर कंपनीचा शेअर्स 1.39% च्या तेजीसह 21.95 रुपयांवर ट्रेड करत होते. कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने तिसऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजी दिसून आली आहे. स्टार्ट अप कंपनी Falcon मुळे ही तेजी आल्याचे मानले जात आहे.

यस बँक आणि Falcon यांच्यात करार - बिझनेस स्टँडर्डच्या रिरोर्टनुसार, येस बँक आणि Falcon ने करारासंदर्भात सहमती दर्शवली आहे. Falcon ही एक स्टार्ट अप कंपनी आहे. ही कंपनी बास (Banking-as-a-Service) मॉडेलवर काम करते. Falcon, येस बँकेशिवाय ICICI Bank, इंडसइंड बँक, पंजाब नॅशनल बँक, व्हीसा आणि NPCI लाही आपली सर्व्हीस प्रोव्हाईड करते.

शेअर बाजारात येस बँकेचे शेअर 2.77 टक्क्यांच्या उसळीसह  22.25 रुपयांच्या इंट्रा-डे हायवर पोहोचला आहे. 29 डिसेंबर 2022 रोजी येस बँकेच्या एका शेअरची किंमत 20.15 रुपये होती. अर्थात तेव्हापासून आतापर्यंत कंपनीच्या शेअरची किंमत 10.42 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. तसेच, गेल्या 5 ट्रेडिंग सेशनसंदर्भात बोलायचे झाल्यास, कंपनीचा शेअर 12.41 टक्यांनी वाढले आहेत. 2022 मध्ये येस बँकेतील गुंतवणूकगुंतवणूकदारांसाठी जबरदस्त ठरली होती. यादरम्यान बँकेने पोझिशनल गुंतवणूकदारांना 57.78 टक्क्यांपर्यंतचा परतावा देत मालामाल केले होते. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकयेस बँकबँक