Join us

चांदी तीन हजार, सोने ९५० रूपयांनी वधारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 02:03 IST

Silver-gold prices : लॉकडाऊन अनलॉक होत असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर-देखील आयात-निर्यात पूर्वपदावर येत आहे.

जळगाव : सणासुदीच्या काळात मागणी वाढत असल्याने सोने-चांदीच्या भावात वाढ सुरू झाली आहे. शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी चांदीच्या भावात एक हजार रुपयांनी, तर चार दिवसात तब्बल तीन हजार रुपयांनी वाढ झाली. चांदीचे भाव पुन्हा ६५ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहे. सोन्याच्या भावाता चार दिवसात ९५० रुपयांनी वाढ झाली.लॉकडाऊन अनलॉक होत असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर-देखील आयात-निर्यात पूर्वपदावर येत आहे. यामध्ये सर्वच देशांकडून सोने-चांदीला मागणी वाढत असल्याने व त्यात सोने खरेदीत मोठा हिस्सा असलेल्या भारतातही सणासुदीच्या काळात या धातूंना मागणी वाढत आहे. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा बाजारपेठेत लगबग वाढल्याने सोने-चांदीचे भाव वाढू लागले आहे.

आठवडाभरात ४५०० रुपयांनी वाढगेल्या आठवड्यात २९ ऑक्टोबर रोजी ६१ हजार रुपये असलेल्या चांदीच्या भावात वाढ होऊन तो २ नोव्हेंबर रोजी ६२ हजार ५०० रुपयांवर पोहोचला. त्यानंतर ५ रोजी ६४ हजार ५०० व आता ६ रोजी ६५ हजार ५०० रुपयांवर पोहोचला. त्यामुळे आठवडाभराचे भाव पाहिले तर चांदीत साडेचार हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

टॅग्स :चांदीसोनंव्यवसाय