नवी दिल्ली : बाजारातील कमकुवत संकेत, अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने सोमवारी सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. चांदीच्या दरात ९,००० रुपयांनी घसरण होऊन ती २,५६,५०० रुपये प्रति किलोवर आली, तर सोन्याच्या दरात २,९५० रुपयांनी घट होऊन ते १,६०,२५० प्रति १० ग्रॅमवर आले.
सराफा असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, चांदीच्या दरात ३.४ टक्क्यांची घसरण झाली. शुक्रवारी ती २,६५,५०० रुपये प्रति किलो होती. सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली असून, त्यात १.८१ टक्क्यांची घट झाली आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात? पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून, त्याचा परिणाम गुंतवणुकीच्या प्रवाहावर झाला आहे. पुढील काही दिवसांमध्ये सोने-चांदीच्या दरात मोठी हालचाल होण्याची शक्यता कमी आहे. बाजाराचे लक्ष आता फेडरल ओपन मार्केट कमिटी बैठकीकडे आहे. त्यातून आर्थिक अंदाज आणि व्याजदर धोरणाबाबत संकेत मिळतील.
Web Summary : Weak market signals and a strong dollar caused a significant drop in gold and silver prices. Silver plummeted ₹9,000 to ₹2,56,500 per kg, while gold decreased by ₹2,950 to ₹1,60,250 per 10 grams. Experts anticipate stable prices as markets await the Federal Reserve meeting.
Web Summary : कमजोर बाजार संकेतों और डॉलर की मजबूती से सोना-चांदी के दाम में भारी गिरावट आई। चांदी ₹9,000 गिरकर ₹2,56,500 प्रति किलो और सोना ₹2,950 गिरकर ₹1,60,250 प्रति 10 ग्राम पर आ गया। विशेषज्ञों को फेडरल रिजर्व की बैठक का इंतजार है, जिससे बाजार स्थिर रहने की उम्मीद है।