Silver Price Today: भारतातील चांदीच्या किमतींमध्ये अलीकडच्या काळात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार संभ्रमात पडलेत. जानेवारी २०२६ मध्ये ₹४,२०,०४८ प्रति किलो या आपल्या विक्रमी स्तरावर पोहोचल्यानंतर, आता चांदी सुमारे ४४% म्हणजेच १,८५,३४८ रुपयांनी कोसळून ₹२,३४,७०० च्या आसपास आली आहे. इतक्या मोठ्या घसरणीनंतर, ही खरेदीची योग्य संधी आहे की अजून घसरण बाकी आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
घसरणीची कारणं काय?
तज्ज्ञांच्या मते, या घसरणीमागे अनेक जागतिक कारणे आहेत. अमेरिकन डॉलरची मजबुती, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, वाढती महागाई आणि अमेरिकेतील व्याजदर दीर्घकाळ उच्च राहण्याची शक्यता यामुळे चांदीवर दबाव निर्माण झाला आहे. विशेषतः अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे बाजारपेठेत अनिश्चितता वाढली असून, गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत.
पाकिस्तानात घरगुती सिलेंडरची किंमत ४५०० रुपयांवर; १७००० पर्यंत गेले कमर्शिअल सिलेंडरचे दर
जाणकार काय म्हणतात?
जाणकार सांगतात की, चांदीचा स्वभाव सोन्यापेक्षा वेगळा असतो. सोनं हे 'सुरक्षित गुंतवणूक' (Safe Haven) मानलं जाते, तर चांदीचा मोठा हिस्सा औद्योगिक मागणीवर अवलंबून असतो. याच कारणामुळे तेजीच्या काळात चांदी वेगानं धावते, परंतु घसरणीच्या वेळी तितक्याच वेगानं कोसळते. अलीकडच्या काळात हेच चित्र पाहायला मिळालं आहे.
घसरणीनंतर आता चांदीमध्ये हलक्या सुधारणेचे संकेतही दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किमती थोड्या वधारल्या असून घरगुती बाजारातही खरेदी वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते, ही तेजी प्रामुख्याने ‘व्हॅल्यू बाइंग’ आणि शॉर्ट कव्हरिंगमुळे आहे, म्हणजेच गुंतवणूकदार स्वस्त दरात खरेदी करत आहेत.
पुढे काय होणार?
भविष्याबद्दल तज्ज्ञांचे मत संतुलित आहे. जागतिक परिस्थिती स्थिर झाली आणि महागाईवर नियंत्रण मिळवता आलं, तर चांदीचे दर हळूहळू ₹२,८०,००० प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र, मजबूत डॉलर आणि व्याजदरांचा दबाव या तेजीवर मर्यादा आणू शकतो.
एकूणच, चांदीमधील ही मोठी घसरण गुंतवणुकीची संधी नक्कीच देत आहे, परंतु त्यातील जोखीमही कमी नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांना एकाच वेळी सर्व पैसे लावण्याऐवजी हळूहळू गुंतवणूक करण्याचा आणि बाजाराच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिलाय.
Web Summary : Silver prices plummeted ₹1.85 lakhs after peaking in January 2026. Experts cite global factors like a strong dollar and high interest rates. Gradual investment is advised, monitoring market movements. A rise to ₹2,80,000 per kilo is possible if conditions stabilize.
Web Summary : जनवरी 2026 में चरम पर पहुंचने के बाद चांदी की कीमतों में ₹1.85 लाख की गिरावट आई। विशेषज्ञों ने मजबूत डॉलर और उच्च ब्याज दरों जैसे वैश्विक कारकों का हवाला दिया। बाजार की गतिविधियों पर नजर रखते हुए धीरे-धीरे निवेश करने की सलाह दी जाती है। यदि स्थितियां स्थिर होती हैं तो ₹2,80,000 प्रति किलो तक वृद्धि संभव है।