Join us
Daily Top 2Weekly Top 5

चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 06:31 IST

चांदी २५ डिसेंबर रोजी एक दिवस स्थिर राहिली होती. मात्र त्यानंतर पुन्हा २६ व २७ डिसेंबरला मोठी वाढ नोंदविली गेली.

जळगाव : चांदीच्या भावात वाढ सुरूच असून, शनिवारी एकाच दिवसात थेट १४ हजार ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी दोन लाख ४७ हजार रुपयांवर पोहोचली. सोन्याच्याही भावात एक हजार ४०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख ३९ हजार ७०० रुपयांवर पोहोचले.

चांदी २५ डिसेंबर रोजी एक दिवस स्थिर राहिली होती. मात्र त्यानंतर पुन्हा २६ व २७ डिसेंबरला मोठी वाढ नोंदविली गेली.

 २६ रोजी १० हजार ५०० रुपयांची वाढ झाली आणि २७ रोजी पुन्हा १४ हजार ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी दोन लाख ४७ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. जीएसटीसह आता चांदी दोन लाख ५४ हजार ४१० रुपयांवर पोहोचली आहे.

आठवडाभरात ४२,५००ची वाढ; पण तुटवडा कायम गेल्या आठवड्याची तुलना पाहता आठवडाभरात चांदी ४२ हजार ५०० रुपयांनी वधारली आहे.एकीकडे चांदीचा तुटवडा व दुसरीकडे जागतिक पातळीवर मागणी वाढत असल्याने भावात वाढ होत असल्याचे व्यावसायिक सांगतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Silver Soars Past ₹2.5 Lakh with GST; ₹14,500 Jump

Web Summary : Silver prices surged, jumping ₹14,500 in a day to ₹2.47 lakh. Gold also rose by ₹1,400 to ₹1,39,700. Silver increased ₹42,500 in a week due to global demand and scarcity. Including GST, silver now costs ₹2,54,410.
टॅग्स :चांदीजळगाव