Join us

Shark Tank India-3: ५० हजारांवरुन उभं केलं १२ कोटींचं Startup, दीपिंदर गोयल म्हणाले, "हीच खरी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 15:28 IST

सध्या शार्क टँक इंडियाचा तिसरा सीझन सुरू झाला आहे.

शार्क टँक इंडियाच्या (Shark Tank India-3) तिसऱ्या सीझनचा दुसरा एपिसोडही नुकताच प्रदर्शित झाला. या एपिसोडमध्ये दीपंदर गोयलदेखील (Deepinder Goyal) अन्य शार्क्स सोबत दिसले. दीपंदर गोयल हे ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप Zomato चे संस्थापक आहेत. जेव्हा त्यांच्या मित्रांना रेस्टॉरंट आणि खाण्याच्या मेन्यू शोधण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागल्याचं दिसलं तेव्हा झोमॅटोची कल्पना त्यांच्या मनात आली. दुसऱ्या एपिसोडमध्ये, ३ स्टार्टअप्सनं त्यांची पिच दिली, त्यापैकी एक नोएडाचा हेल्दी स्नॅकिंग स्टार्टअप द सिनेमन किचन आहे.हे स्टार्टअप नोएडामध्ये राहणाऱ्या प्रियाशा सलुजा यांनी सुरू केलं आहे. नोएडा-६३ मध्ये त्यांची फॅक्ट्री आहे. प्रियाशानं २०१९ मध्ये याची सुरुवात केली होती. याआधी त्या एका मार्केटिंग कंपनीत काम करत होत्या. सध्या त्या तयार करत असलेली उत्पादनं १०० टक्के ग्लूटेन मुक्त, दुग्धविरहित आणि प्लांट बेस्ड आहेत. सध्या कंपनीकडे एकूण ४५ एसकेयु आहेत.  प्रियाशा सलुजा यांनी अवघ्या ५० हजार रुपयांपासून हा व्यवसाय सुरू केला. या पैशातून आपण एक ओव्हन, ब्लेंडर आणि काही बेकिंग ट्रे खरेदी केल्या आणि व्यवसाय सुरू केला, अशी माहिती त्यांनी यादरम्यान दिली.काय म्हणाले दीपिंदर गोयल?डीलदरम्यान, अमन गुप्ता यांनी इक्विटीसह काही रक्कम आणि १२ टक्के दरानं ५० लाख रुपयांचे कर्ज देऊ केलं, ज्यावर प्रियाशा यांनी तिचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर आपल्याला स्वस्त दरात कर्ज सहज मिळेल, असं म्हटलं. यावर दीपंदर गोयल यांनीही हसत 'ही खरी शार्क आहे,' असं म्हटलं. दरम्यान, यानंतर गरज भासल्यास आपण त्यांना मार्गदर्शनही करू असं गोयल यांनी प्रियाशा यांना सांगितलं.

टॅग्स :झोमॅटोव्यवसाय