Share Market Today: डिसेंबर सीरिज्या जोरदार सुरुवातीनंतर गुरुवारी शेअर बाजारानं आपली तेजी कायम ठेवली. निफ्टी आजवरच्या उच्चांकाच्या जवळ उघडला आणि नंतर लाईफटाईम हाय जवळ पोहोचला. निफ्टीनं २५,२९५ चा विक्रमी उच्चांक गाठला. बँक निफ्टीनंही सुरुवातीच्या कामकाजादरम्यान नवीन विक्रमी उच्चांक गाठला.
बाजार उघडण्यापूर्वी जागतिक बाजारातील भावना अत्यंत सकारात्मक दिसून आल्या. मागील सत्रातील तीव्र तेजीनंतर, देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूकदारांनी आक्रमक खरेदी केल्यानं भावना बळकट झाली आहे. शिवाय, अमेरिकेपासून कमोडिटीजपर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये तेजीला पाठिंबा दिसून येत आहे. बाजारातील सुट्टीपूर्वी मर्यादित श्रेणीत काही प्रमाणात प्रॉफिट बुकिंग दिसून येऊ शकतं, परंतु एकूणच कल मजबूत आहे.
FII-DII कडून जोरदार खरेदी
डिसेंबर सीरिजच्या पहिल्या दिवशी, एफआयआयनं रोख बाजारात अंदाजे ₹४,८०० कोटींची निव्वळ खरेदी केली. डेरिव्हेटिव्ह्ज आणि इतर विभागांमधील निव्वळ स्थिती एकत्रितपणे ₹७,३४७ कोटी होती. देशांतर्गत फंडांनी सलग ६३ व्या व्यापारी दिवशी खरेदीचा जोर सुरू ठेवला, त्यांनी ₹६,२४८ कोटी किमतीचे शेअर्स खरेदी केले. मोठ्या आणि लिक्विड स्टॉक्समध्ये निधीचा सतत ओघ सुरू राहिल्याने बाजाराला मजबूत आधार मिळाला.
अमेरिकन बाजारांनी सलग चौथ्या दिवशीही तेजीचा कल कायम ठेवला. डाउ जोन्स ३०० अंकांनी वधारला. नॅस्डॅक २०० अंकांनी वधारला आणि टेक शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. एस अँड पी ५०० देखील मजबूत राहिले. आज थँक्स गिव्हिंगसाठी अमेरिकन बाजार बंद राहतील, तर डाउ फ्युचर्स सध्या किंचित घसरणीसह व्यवहार करत आहेत.
Web Summary : Indian stock market surged, with Nifty nearing its lifetime high and Bank Nifty achieving a record peak. Strong FII and DII buying supported the rally. Positive global cues and continuous fund inflows fueled the market's upward trajectory. US markets showed gains.
Web Summary : भारतीय शेयर बाजार में तेजी आई, निफ्टी अपने सर्वकालिक उच्च स्तर के करीब और बैंक निफ्टी ने रिकॉर्ड शिखर हासिल किया। मजबूत एफआईआई और डीआईआई खरीदारी ने रैली का समर्थन किया। सकारात्मक वैश्विक संकेतों और निरंतर फंड प्रवाह ने बाजार की ऊपर की ओर गति को बढ़ावा दिया। अमेरिकी बाजारों में लाभ दिखा।