शेअर बाजारातील हाहाकाराच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी टाटा समूहाची कंपनी टाटा मोटर्सचे शेअर्सदेखील दबावाखाली दिसले. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी टाटा मोटर्सचे शेअर्स 2.73% ने घसरून 724 रुपयांवर बंद झाले. हा शेअर सध्या 52 आठवड्यांचा उच्चांक अर्थात अर्थात 1179.05 रुपययांपेक्षा सुमारे 38 टक्के डिस्काउंटवर ट्रेडिंग करत आहे. महत्वाचे म्हणजे, 30 जुलै 2024 रोजीही हा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. महत्वाचे म्हणजे, या शेअरवर एक्सपर्ट बुलिश दिसत आहेत.
शेअरची टार्गेट प्राइस -ब्रोकरेज एलकेपी सिक्योरिटीजने टाटा मोटर्सच्या शेअरला बाय रेटिंग दिली आहे. ब्रोकरेजच्या मते देशांतर्गत कॉमर्शिअल व्हेइकल्स (सीवी) ची मागणी दुसऱ्या सहामाहीत वाढू शकते आणि नुकत्याच झालेल्या लॉन्चिंगने सपोर्ट मिळण्याची आशा आहे. देशांतर्गत ब्रोकरेजने या शेअरवर 970 रुपयांची नवी टार्गेट प्राइस सुचवली आहे. जी सध्याच्या किंमतीपेक्षा 30 टक्के अधिक आहे.
नुकतीच मिळालीय ऑर्डर -टाटा मोटर्सला उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (UPSRTC) नुकतीच 1,297 बस चेसिसची ऑर्डर मिळाली आहे. टाटा मोटर्सने दिलेल्या माहितीनुसार, UPSRTC कडून एका वर्षात मिळालेली ही तिसरी ऑर्डर आहे. अशा प्रकारे त्यांना एकूण 3,500 हून अधिक युनिट्सची ऑर्डर मिळाली आहे. टाटा LPO 1618 डिझेल बस चेसिस विशेषतः शहरांतर्गत आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाइन केलेले आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)