Join us

Share Market Opening : सलग ५ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात तेजी, निफ्टीसाठी २३,८०० पहिलं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 10:02 IST

Share Market Opening : गेल्या आठवड्यात सातत्यानं घसरण झाल्यानंतर सोमवारी, २३ डिसेंबर २०२४ रोजी शेअर बाजारात काहीशी वाढ दिसून येत आहे.

Share Market Opening : गेल्या आठवड्यात सातत्यानं घसरण झाल्यानंतर सोमवारी, २३ डिसेंबर २०२४ रोजी शेअर बाजारात काहीशी वाढ दिसून येत आहे. ख्रिसमस सप्ताहाच्या पहिल्या दिवशी निफ्टीनं १५१ अंकांच्या वाढीसह २३७३८ वर कामकाजाला सुरुवात केली, तर सेन्सेक्स ४८९ अंकांच्या वाढीसह ७८४८९ वर उघडला.

सुरुवातीच्या व्यवहारात जेएसडब्ल्यू स्टील, आयटीसी, डॉक्टर रेड्डीज, टाटा मोटर्स, टाटा स्टील या शेअर्समध्ये निफ्टी ५० पॅकमधून तेजी दिसून येत आहे. निफ्टी ५० मध्ये विमा क्षेत्रातील दोन प्रमुख शेअर्स म्हणजे एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स आणि एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स. अपोलो हॉस्पिटल्स, आयशर मोटर्स, एनटीपीसी सारख्या शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा दिसून येतोय.

गेल्या आठवड्यात बाजारात सातत्याने घसरण होत होती आणि निफ्टीमध्ये केवळ पाच ट्रेडिंग सेशनमध्ये ११०० हून अधिक अंकांची घसरण नोंदवली. या घसरणीत निफ्टीच्या डेली चार्टवर मोठा रेझिस्टंस तयार झाला आहे. निफ्टीसाठी पहिलं आव्हान म्हणजे २३८०० ची पातळी आहे, जिथे मोठा रेझिस्टन्स तयार झालाय.

अमेरिकन शेअर बाजारात तेजी

अपेक्षेपेक्षा कमी महागाईचा रिपोर्ट आणि फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांच्या भाष्यामुळे व्याजदराबाबतची चिंता कमी झाल्यानं दोन सुस्त सत्रांनंतर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तेजी दिसून आली. महागाईदर अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने आशियाई शेअरबाजारात तेजी आली आणि पुन्हा व्याजदरात कपात होण्याची शक्यता निर्माण झाली. तर दुसरीकडे डॉलर स्थिर राहिला.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक